रेल्वे भाडेवाढीचा निषेध : महाविद्यालयीन युवकांना काँग्रेसशी जोडणारनागपूर : दक्षिण नागपूरचे आमदार दीनानाथ पडोळे यांनी नुकताच दक्षिण नागपूर कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा अयोध्यानगर येथील शारदा चौकातील आदर्श मंगल कार्यालयात आयोजित केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार गेव्ह आवारी होते. या मेळाव्यात पक्षबांधणीचा निर्धार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणूून माजी आमदार अशोक धवड, गिरीश पांडव, अॅड. अभिजित वंजारी, नगरसेवक योगेश तिवारी, वासुदेव ढोके, विणा बेलगे, दिनेश तराळे, प्रवीण आगरे उपस्थित होते. मेळाव्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पक्षबांधणीबाबत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी आ. दीनानाथ पडोळे यांनी दक्षिण नागपुरात केलेल्या कार्याचा गौरव करून आपल्या समस्या मांडल्या. आ. पडोळेंनी यावेळी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र शासनाने केलेल्या रेल्वे भाडेवाढीचा निषेध मेळाव्यात करण्यात आला. यावेळी गेव्ह आवारी यांनी पक्षाच्या मजबूत बांधणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पक्षाच्या ध्येयधोरणाची जाणीव करून नव्याने कार्यकर्ता निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी विजय बाभरे, सुभाष भोयर, राजेश देशमुख, कृष्णराव निरुळकर, कुणाल पुरी, हिराताई बडोदेकर, डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, कवीश्वर शंभरकर, रेखा थूल, चंद्रशेखर श्रीराव, संजय झाडे, शंकर सुगंध, विजय साळवे, अतुल सातपैसे, रामु घाडगे, सुनील अग्रवाल, रत्नमाला फोपरे, प्रकाश साळुंके, शालीकराम राठोड, विलास गावंडे, तौशिक घुले, नरेंद्र बोरकर, मामा राऊत, सागर तुर्केल, चंद्रशेखर हिंगणीकर, राजेश बेलखोडे, देवेंद्र नागपूरे, राजु इंगोले, कांतीलाल सूयर्वंशी, गुड्डु मिश्रा, अली भाई उपस्थित होते. संचालन जॉन थॉमस यांनी केले. (प्रतिनिधी)
दक्षिणच्या मेळाव्यात पक्षबांधणीचा निर्धार
By admin | Updated: June 27, 2014 00:39 IST