शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

निराश्रित भाचीला वेश्याव्यवसायात ढकलले

By admin | Updated: May 10, 2015 02:18 IST

निराश्रित अल्पवयीन भाचीला तिच्या सख्ख्या मोठ्या आईनेच (आईची मोठी बहीण) वेश्याव्यवसायात ढकलले....

नागपूर : निराश्रित अल्पवयीन भाचीला तिच्या सख्ख्या मोठ्या आईनेच (आईची मोठी बहीण) वेश्याव्यवसायात ढकलले. तब्बल तीन वर्षांपासून नरकयातना भोगणाऱ्या या मुलीने अत्याचार असह्य झाल्यामुळे अखेर सेवाभावी महिलांच्या मदतीने सदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली. तिच्या दलाल साथीदाराचा शोध सुरू आहे.पीडित मुलगी १५ वर्षांची आहे. लहानपणीच तिच्या आईचा मृत्यू झाला. वडिलांनी दुसरा घरठाव करून या मुलीला निराश्रित केले. त्यामुळे साडेतीन ते चार वर्षांपूर्वी ती अजनीतून तिच्या मोठ्या आईच्या आश्रयाला आली. तिची मोठी आई आरोपी मंदा सुरेश बोंगीरवार हिच्या सदरमधील घरी राहात असताना तीन वर्षांपूर्वी (ती अवघी १२ वर्षांची असताना) एका आरोपीने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. मंदाने मुलीसमान भाचीला मदत करण्याऐवजी एका दलालाच्या माध्यमातून वेश्याव्यवसायात ढकलले. कामठी आणि सीताबर्डीतील विविध हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मंदा आणि तिचा साथीदार या मुलीकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेऊ लागले. या दोघांना मोठी रक्कम देऊन ग्राहक या मुलीवर पाशवी अत्याचार करू लागले. तीन वर्षांपासून नरकयातना भोगणारी ही मुलगी दोन दिवसांपूर्वी अजनीतील आपल्या जुन्या घरी पोहचली.तेथील परिचित महिलांना तिने आपली कैफियत ऐकवली. काही सेवाभावी महिलांनी तिला लगेच अजनी ठाण्यात नेले. प्रकरण सदर परिसरातील असल्यामुळे अजनी पोलिसांनी त्यांना सदरमध्ये पाठविले. येथे ठाणेदार रफिक बागवान यांनी माहिती ऐकून घेतल्यानंतर लगेच गुन्हा दाखल केला. पीएसआय पांडव, पीएसआय बागडे यांनी तपास करून आरोपी मंदाला अटक केली. आरोपी मंदाचा पती रेल्वेत होता. त्याचा मृत्यू झाल्यापासून ती एकाकी असल्याचे पोलीस सांगतात.(प्रतिनिधी)