शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

देशमुखांचा केदारांवरून मुख्यमंत्र्यांवर नेम

By admin | Updated: June 24, 2014 01:01 IST

जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आ. सुनील केदार यांना पाठीशी घालत असल्याचा मुद्दा समोर करीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : केदारांना पाठीशी घालताहेत नागपूर : जिल्हा बँक घोटाळाप्रकरणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आ. सुनील केदार यांना पाठीशी घालत असल्याचा मुद्दा समोर करीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांवर नेम साधला. केदार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी चुकीच्या पद्धतीने हाताळले. हा मुख्यमंत्र्यांचा राजकीय भ्रष्टाचार आहे, असा आरोप करीत देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू होत्या. अशात आज देशमुख यांनी केदार प्रकारणाचा आधार घेत मुख्यमंत्र्यांमा टार्गेट केले. देशमुख म्हणाले, आ. केदार यांनी १२ वर्षांपूर्वी जिल्हा बँकेत १५० कोटींचा घोटाळा केला. चौकशीत ते सिद्ध झाले. घोटाळ्याची रक्कम सरकारने भरावी, यासाठी केदारांनी खूप प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांना धमकाविण्याचे काम केले. गरीब मुख्यमंत्र्यांनी घाबरून सहकार खात्याची चौकशी संथ केली. आता या केसमध्ये तज्ज्ञ वकिलाकडून काढून दुसऱ्याच वकिलाची नियुक्ती केली. मुख्यमंत्र्यांनी कर्तव्य पार पाडावे. केदारांची संपत्ती विकून घोटाळ्याची रक्कम वसूल करावी. खटला जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष अधिकारी नेमावा, अशी मागणी त्यांनी केली. घोटाळ्यामुळे शेतकरी, ठेवीदार, पेन्शनर्स, पगारदारांचे हाल झाले. त्यामुळे आता अशा भ्रष्ट व्यक्तीला मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे तिकीट देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)