शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

देशमुख पिता-पुत्रातील वाद अखेर शमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 10:05 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी चक्क धाकटा पुत्र डॉ. अमोल याच्या विरोधात मानसिक छळवणुकीची तक्रार पोलिसात केली. देशमुख कुटुंबीयांशी सलगी असणाऱ्यांनी मध्यस्थी केली व शेवटी रणजितबाबू यांनी मुलाविरोधातील तक्रार मागे घेतली.

ठळक मुद्देरणजितबाबूंनी पोलीस तक्रार मागे घेतली पण घर रिकामे करण्याचा आग्रह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी चक्क धाकटा पुत्र डॉ. अमोल याच्या विरोधात मानसिक छळवणुकीची तसेच घरावर कब्जा केल्याची तक्रार सीताबर्डी पोलिसात केली. या तक्रारीनंतर देशमुख कुटुंबीयांसह राजकीय वर्तुळात वादळ उठले. मात्र, २४ तासानंतर सर्वकाही सेटल झाले. देशमुख कुटुंबीयांशी सलगी असणाऱ्यांनी मध्यस्थी केली व शेवटी रणजितबाबू यांनी मुलाविरोधातील तक्रार मागे घेतली. मात्र, सोबतच मुलाने आपले घर सोडावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.सिव्हिल लाईन्स येथील आपल्या घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अमोल याने अवैधरीत्या कब्जा केला आहे. वारंवार सांगूनही तो घर रिकामे करण्यास तयार नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार रणजितबाबू यांनी सोमवारी दाखल केली होती. तक्रारीमुळे देशमुख पिता-पुत्रातील वाद चव्हाट्यावर आला होता. रणजित देशमुख यांचे आमदार डॉ. आशिष देशमुख व डॉ. अमोल देशमुख हे दोन पुत्र आहेत. डॉ. आशिष हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘बरकत’ या बंगल्यात स्वतंत्र राहतात. तर डॉ. अमोल हे रणजितबाबू यांच्या जीपीओ चौकातील घरात वास्तव्यास होते. देशमुख हे सध्या वयाच्या सत्तरीत असून पार्किन्सन आजाराने ग्रस्त आहेत. सोमवारी दिवसभर सीताबर्डी पोलिसांनी याप्रकरणी कुठलीही कारवाई केली नाही. आपल्या मुलाने घराचे कुलूप तोडून कथित भागावर कब्जा केल्याचे देशमुख यांनी तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी देशमुख यांची तक्रार प्राप्त झाल्याचे सीताबर्डी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांनी स्पष्ट केले होते. तक्रारीनंतर अमोल यांनी रणजितबाबू यांची भेट घेतली. त्यांचा गैरसमज दूर केला. तुम्ही माझे वडील आहात, तुमचे घर बळकावून मी काय साध्य करू, असे सांगत घर सोडण्याची तयारी दर्शविली व वेळ मागितला. याबाबत लोकमतशी बोलतानना रणजितबाबू म्हणाले, मला माझ्या घरात मुलांचा हस्तक्षेप नको आहे. सिव्हिल लाईन्स येथील घर रिकामे करण्यासाठी मी गेल्या दोन वर्षांपासून सांगत आहे. मात्र, त्याने ऐकले नाही. त्याच्या वास्तव्यामुळे माझी प्रायव्हसी भंग होत आहे. मी वारंवार सांगूनही काहीच परिणाम झालेला नाही. त्यामुळे मला नाईलाजास्तव पोलिसात धाव घ्यावी लागली. मात्र, हितचिंतकांनी मध्यस्थी केल्यानंतर आमच्यातील वाद क्षमला आहे. अमोलने आपले घर खाली करावे, एवढीच आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्यासाठी वडील नेहमीच पूज्यनीय : अमोल देशमुखया प्रकरणाबाबत अमोल देशमुख लोकमतशी बोलताना म्हणाले, माझे वडील माझ्यासाठी नेहमीच पूज्यनीय आहेत. मी वेळोवेळी त्यांच्या आजारपणाची काळजी घेतली. काही दिवसांपूर्वीच मी त्यांना आकस्मिकपणे वोक्हार्टमध्ये भरती केले होते. त्यांचा माझ्याबाबत गैरसमज झाला होता. मी त्यांची भेट घेऊन गैरसमज दूर केला. त्यांचे आशीर्वादही घेतले. काही लोक आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते कशासाठी हे करीत आहे, बाहेरचे आहेत की घरचे हे कळायला मार्ग नाही. पण वडिलांची दिशाभूल करून माझी बदनामी करण्यासाठी हा प्रकार करवून घेण्यात आल्याचा संशय आहे. माझ्यासाठी वडिलांच्या आशीर्वादाचे छत्र असले तरी पुरेसे आहे.

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुख