शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशमुख पिता-पुत्रांनी सामंजस्याने वाद सोडवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:18 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख आणि त्यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख, सून डॉ. रुचिका देशमुख यांनी त्यांचे आपसातील वाद सामंजस्याने सोडवून समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असा सल्ला उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष, पदस्थ अधिकारी निर्वाह न्यायाधिकरण नागपूर शिरीष पांडे यांनी आपल्या आदेशाद्वारे दिला आहे. तसेच मालमत्तेच्या मालकी हक्कासंदर्भात प्रश्न असल्यास न्यायालयाकडे दाद मागावी, असेही सांगितले.

ठळक मुद्देउपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा सल्ला : वडिलांची सेवा करा, त्यांचे जीवन त्यांच्या मर्जीप्रमाणे जगू द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख आणि त्यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख, सून डॉ. रुचिका देशमुख यांनी त्यांचे आपसातील वाद सामंजस्याने सोडवून समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असा सल्ला उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष, पदस्थ अधिकारी निर्वाह न्यायाधिकरण नागपूर शिरीष पांडे यांनी आपल्या आदेशाद्वारे दिला आहे. तसेच मालमत्तेच्या मालकी हक्कासंदर्भात प्रश्न असल्यास न्यायालयाकडे दाद मागावी, असेही सांगितले.रणजित देशमुख यांनी त्यांचा मुलगा डॉ. अमोल व सून रुचिका यांच्याविरुद्ध ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७’अंतर्गत कलम २३ प्रमाणे अर्ज केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, माझा मुलगा व सुनेने बळजबरीने माझ्या घराचा ताबा घेतला आहे. त्यामुळे माझ्या व्यक्तिगत जीवनाला बाधा निर्माण झाला आहे. तेव्हा मुलगा व सुनेला घरात प्रवेश करण्यापासून रोखावे, असे त्यांचे म्हणणे होते. याबाबत नोटीस बजावून दोघांचेही म्हणणे ऐकून घेत आदेश बजावले. या आदेशात शिरीष पांडे यांनी म्हटले आहे, की रणजित देशमुख व त्यांचा मुलगा हे सध्या राहत असलेले महानगरपालिका क्षेत्रातील घर हे रणजित देशमुख यांच्या नावे असून, ते वारसा हक्कातील रकमेतून खरेदी केल्याचे दिसून येते. ते समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असून, त्यांचा मुलगा व सून हे डॉक्टर असल्याने वडील व सासºयाची सेवा व देखभाल करण्याच्या दृष्टीने त्यांचे वडिलांच्या ठिकाणी राहणे आवश्यक ठरते. तेव्हा मुलगा व सुनेने नेहमी रणजित देशमुख यांची शुश्रुषा आणि देखभाल करावी. त्यांचा अपमान व त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये. तसेच त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगू द्यावे, असेही आदेशात स्पष्ट म्हटले आहे. कलम २३ मधील तरतुदीनुसार मालमत्ता इतर कुणाला हस्तांतरण केल्याबाबत रणजित देशमुख यांनी कोणताही पुरावा उपलब्ध करून न दिल्याने असे हस्तांतरण रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट करीत मालमत्तेच्या मालकी हक्कासंदर्भात न्यायालयात दाद मागावी, असे सांगितले.

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुखCourtन्यायालय