शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याण उपायुक्त बाबासाहेब देशमुख निलंबित, कृषी अवजारे पुरवठ्यात बचतगटांची फसवणूक केल्याचा ठपका

By आनंद डेकाटे | Updated: May 5, 2025 23:02 IST

Nagpur News: कृषी अवजारे पुरवठा करताना बचत गटांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत समाज कल्याण विभागाचे उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सहसचिव सोमनाथ बागुल यांच्या स्वाक्षरीने सोमवारी शासन आदेश जारी करण्यात आले.

- आनंद डेकाटेनागपूर - कृषी अवजारे पुरवठा करताना बचत गटांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत समाज कल्याण विभागाचे उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सहसचिव सोमनाथ बागुल यांच्या स्वाक्षरीने सोमवारी शासन आदेश जारी करण्यात आले.

समाजकल्याण विभागाने २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचत गटांना कृषी अवजारे देण्याची योजना आखली. प्रत्येक महिला बचत गटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य देण्यात येणार होते. परंतु उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्य मिळालेच नाही. हे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात आले. १० टक्के रक्कम भरल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात टाकण्यात आली. समाज कल्याण विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात आल्यानंतर ती लगेच काढण्यात आल्याचे दिसून आले. पुरवठादाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले. परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परत नेले. १० टक्के रक्कम त्रयस्थ व्यक्तीकडून भरण्यात आल्याची बाबही तपासात समोर आली.

काही महिला बचत गटांचे प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचे समोर आले. काही प्रमाणपत्रांवर एक-दोन वर्षांपूर्वीची तारीख होती. त्यामुळे बचत गट बोगस तयार करण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यातच हा प्रकार झाल्याचा अंदाज आहे. प्राथमिक चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला होता. त्यांच्याकडून यावर चौकशी समिती गठित करण्यात आली. ही योजना राबविण्यात आली त्यावेळी बाबासाहेब देशमुख सहाय्यक आयुक्त होते. ही योजना राबविण्यात महिला बचत गटाची फसवणूक झाल्याचा ठपका ठेवत देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

खासदार बर्वे यांनी केली होती पीएमओकडे तक्रारया प्रकरणात खासदार श्यामकुमार बर्वे यांनी पीएमओकडे तक्रार केली होती. पीएमओकडून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनीही याबाबत मुंबईत बैठक घेतली होती.

डाॅ. सिद्धार्थ गायकवाड यांच्याकडे प्रभारचंद्रपूर जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त डाॅ. सिद्धार्थ गायकवाड यांच्याकडे उपायुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. गायकवाड हे यापूर्वी जवळपास पाच वर्ष या पदावर कार्यरत होते.

टॅग्स :nagpurनागपूर