शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
2
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
3
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
4
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
5
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
6
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
7
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
10
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
11
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
12
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
13
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
15
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
16
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
17
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
18
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
19
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
20
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी

उपमुख्यमंत्रीपदाचा पेपर आताच फोडणार नाही : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 19:09 IST

सध्या उपमुख्यमंत्रीपदाचा पेपर आताच फोडणार नाही, परंतु जनता जी जबाबदारी देईल ती स्विकारेल, असे म्हणत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केले.

ठळक मुद्देशिवसेना कुणाचाही विश्वास तोडणार नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांत आगामी विधानसभा निवडणूकांसाठी युती होईलच. ही युती सत्तेसाठी नव्हे तर हिंदुत्वासाठी आहे. मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रपरिषदेतील शब्दांवर आम्ही कायम राहणार आहो. कुणाचाही विश्वास शिवसेना तोडणार नाही. सध्या उपमुख्यमंत्रीपदाचा पेपर आताच फोडणार नाही, परंतु जनता जी जबाबदारी देईल ती स्विकारेल, असे म्हणत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केले. मंगळवारी आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा नागपुरात पोहोचली. यावेळी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.युतीमधील जागावाटपाबद्दल मी बोलणार नाही. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात युती बद्दल चर्चा झाली आहे. तेच या बद्दल बोलतील. मी त्यांच्या समोर खूप लहान आहे. मी निवडणूक लढवायची की नाही, कुठून लढवेल हे जनता ठरवेल. सध्या मी जनतेशी संवाद साधण्यावरच भर देत आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यात सद्यस्थितीत विरोधक नसल्याचीच स्थिती आहे, असेदेखील ते म्हणाले. पत्रपरिषदेला सार्वजनिक बांधकाम विकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खा.कृपाल तुमाने, खा.राजन विचारे, आ.सुनिल शिंदे सचिन अहिर हे प्रामुख्याने उपस्थित होते.कर्जमुक्तीमध्ये अनेक त्रुटीयावेळी आदित्य ठाकरे यांनी कर्जमाफीवरुन राज्य शासनावरच अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यासाठी सरकारची मदत केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यकर्ते मदत करत आहेत. जेथे सरकारकडून समस्या सुटत नाही तेथे शिवसेना आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे हीच शिवसेनेची भूमिका आहे, असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले.खंडणीखोर नेत्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हावीशिवसेनेच्या काही नेत्यांवर खंडणीखोरीचे आरोप लागत असल्याचा प्रश्न विचारला आदित्य ठाकरे यांनी ठोस उत्तर दिले नाही. परंतु अशा नेत्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMediaमाध्यमे