शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑन फिल्ड, पुराने नुकसान झालेल्या वस्त्यांची केली पाहणी

By मंगेश व्यवहारे | Updated: September 24, 2023 14:32 IST

मुसळधार पावसात मनपाच्या नेहरुनगर झोन येथील कर विभागात कार्यरत कृष्णा बनाई,  विलोप कावळे यांनी मोहता कुटुंबातील पाच जणांचा जीव वाचवला, त्यांच्या कार्याचे फडणवीस यांनी कौतुक केले.

नागपूर : शुक्रवारी मध्यरात्री शहरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूरसदृश्य परिस्थिती नंतर झालेल्या नुकसानाची राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी प्रत्यक्ष भेट देत पहाणी केली. उपमुख्यमंत्र्यांनी अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट, अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, शंकरनगर परिसरात भेट देत थेट नागरिकांशी संवाद साधला व  माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल,  उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी आदी उपस्थित होते.  फडणवीस यांनी अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट पासून पाहण्याची सुरुवात केली. त्यांनी स्वतः या परिस्थितीची पाहणी करीत घरोघरी जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. मुसळधार पावसात मनपाच्या नेहरुनगर झोन येथील कर विभागात कार्यरत कृष्णा बनाई,  विलोप कावळे यांनी मोहता कुटुंबातील पाच जणांचा जीव वाचवला, त्यांच्या कार्याचे फडणवीस यांनी कौतुक केले.

तसेच प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर पंचनामे करून लागणारी मदत दिली जाणार असल्याचे ग्वाही यावेळी दिले. तसेच पाणी घरात शिरल्यामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश यावेळी फडणीस यांनी दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfloodपूरnagpurनागपूर