शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांबाबतच नेहमी उदासीनता

By admin | Updated: December 14, 2014 00:43 IST

सरकार कुणाचेही असो, आजवर शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याच सरकारने ठोस काम केलेले नाही. औद्योगिक विकासासाठी उद्योगपतींना सर्व सुखसोयी तातडीने उपलब्ध करून दिल्या जातात.

परिसंवाद : राम नेवले यांचे प्रतिपादन नागपूर : सरकार कुणाचेही असो, आजवर शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याच सरकारने ठोस काम केलेले नाही. औद्योगिक विकासासाठी उद्योगपतींना सर्व सुखसोयी तातडीने उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु शेतकऱ्यांबाबत मात्र उदासिनता दाखविली जाते. उत्पादन खर्चाएवढा भावही शेतकऱ्यांना मिळत नाही, मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी शासन तो मिळू देत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही, तर काय करणार. शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरंच थांबवायच्या असतील तर थातूरमातूर कारवाई करून होणार नाही, त्यासाठी मार्शल प्लॅन लागू करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले यांनी केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने चिटणीस पार्क येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान आयोजित दुसऱ्या सत्रातील ‘विदर्भातील शेती, शेतमालाचे भाव, सिंचनाचा अनुशेष परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ या विषयावर आयोजित परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. डॉ. मानवेंद्र काचोळे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, शेतीच्या भरवशावरच जगातील सर्व प्रगत राष्ट्रांनी आपापल्या देशाला विकसित केले आहे. परंतु आपल्या देशात औद्योगिक विकास साधण्यासाठी शेतीकडे दुर्लक्ष होत गेले. त्याचे परिणाम आज दिसून येत आहेत. धर्मराज रेवतकर यांनी विदर्भातील सिंचनाच्या अनुशेषावर प्रकाश टाकला. संध्या एदलाबादकर यांनी विदर्भ पॅकेज शेतकऱ्यांसाठी कसे फोल ठरेल, हे समजावून सांगितले.तर नितीन रोंघे आणि अविनाश काळे यांनी स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास अशक्य असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आज समारोप विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा उद्या दुपारी ३ वाजता समारोप करण्यात येईल. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारोपीय कार्यक्रमात वामनराव चटप व राम नेवले प्रमुख वक्ते राहतील. तत्पूर्वी ‘औद्योगिकीकरण, प्रदूषण, भारनियमन, व्यापारी समस्या’ या विषयावर सकाळी १० ते १२ या वेळात परिसंवाद, अध्यक्षस्थानी डॉ. श्रीनिवास खांदेवाले, सुधीर पालीवाल, परमजित आहुजा, विजय निवल, मृणालिनी फडणवीस, संजय कोल्हे, किशोर पोतनवार प्रमुख वक्त ेराहतील. ‘आदिवासी, वनविकास, भटक्या विमुक्तांच्या समस्या, कुपोषण, बांबू कामगारांचे प्रश्न व संपुष्टात आलेली बारा बलुतेदारी’ विषयावर दुपारी १२ वा. परिसंवाद होईल. धनंजय धार्मिक, अ‍ॅड. नंदा पराते, पारोमिता गोस्वामी, डॉ. वासुदेव फडके सहभागी होतील.