शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

एम्प्रेस मॉलमुळे मनपा डिपे्रस!

By admin | Updated: November 1, 2016 02:31 IST

शासनाच्या २० जुलै २००७ च्या निर्णयातील नमूद अटीनुसार अभिन्यासाचे क्षेत्रफळ ५ हेक्टरपेक्षा अधिक

परवानगीपेक्षा अधिक बांधकाम : नियमानुसार मंजुरी मिळणे अशक्य नागपूर : शासनाच्या २० जुलै २००७ च्या निर्णयातील नमूद अटीनुसार अभिन्यासाचे क्षेत्रफळ ५ हेक्टरपेक्षा अधिक असल्यास अभिन्यासात २५ टक्के जागा सुविधा क्षेत्रासाठी सोडणे आवश्यक आहे. परंतु एम्प्रेस मॉल येथे संपूर्ण भूखंडावर इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. यात तब्बल २८९८६.७६९ चौरस मीटर क्षेत्रात महापालिकेची परवानगी न घेता अवैध बांधकाम करण्यात आलेले आहे. एम्प्रेस मॉल येथील भूखंड १ व २ वर रहिवासी वापर, एकत्रित भूखंड क्रमांक ३ व ४ वर रहिवासी वापर अपेक्षित आहे. या भूखंडावरील पश्चिम बाजूस यापूर्वी दिलेल्या मंजुरी विरुद्ध बेसमेट अधिक पहिला मजला ते ११ मजल्यांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. तसेच याच भूखंडाचे उत्तर बाजूस असलेल्या सुविधा क्षेत्राच्या जागेवर विकासकांनी बेसमेंट अधिक पहिला मजला व दुसऱ्या मजल्याचे विना परवानगीने बांधकाम केलेले आहे. या इमारतीच्या मागील बाजूला सामासिक अंतर न सोडता बांधकाम करण्यात आले आहे. बांधकाम नियमित करण्यासाठी विकासकांनी प्रस्ताव दिला तरी केलेले बांधकाम नियंत्रण नियमावलीनुसार मंजूर करणे शक्य नसल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मंजुरी न घेता सुविधा क्षेत्राचे बांधकाम अ‍ॅमिनिटी स्पेस म्हणून ४७९२.८४ चौरस मीटर जागा दर्शविण्यात आलेली आहे. नकाशात या जागेचा वापर सुविधा क्षेत्र म्हणून दर्शविण्यात आला आहे. परंतु या जागेवर बांधकाम करण्यासाठी अनुमती न घेता ४२४७ चौरस मीटर क्षेत्रात अवैध बांधकाम सुरू आहे. मोकळ्या जागेवर अवैध बांधकाम एम्प्रेस मॉलच्या बांधकाम नकाशात १४३७८.५८ चौरस मीटर खुली जागा दर्शविण्यात आली आहे. या जागेवर क्लब व प्रार्थना स्थळाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या बांधकामासाठी मंजुरी घेण्यात आलेली नाही. विकास नियंत्रण नियमावरीनुसार अनुुज्ञेय बांधकामापेक्षा जास्त बांधकाम करण्यात आले आहे. सर्वसामान्यांना वेगळा न्याय का? सर्वसामान्य नागरिकांनी नकाशाला मंजुरी न घेता अथवा नकाशानुसार मंजूर बांधकामापेक्षा अधिक बांधकाम केल्यास महापालिका व नासुप्र यांच्याकडून कारवाई केली जाते. अतिरिक्त बांधकामावर हातोडा चालविला जातो. परंतु एम्प्रेस मॉलच्या अवैध बांधकामावर अद्याप ठोस स्वरुपाची कारवाई करण्यात आलेली नाही. मॉलसाठी एक व सर्वसामान्यांना वेगळा न्याय का? असा प्रश्न या निमित्ताने शहरातील नागरिकांनी लोकमतशी बोलताना उपस्थित केला आहे.