शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नागपुरात येस बँकेत विड्रॉलसाठी खातेदारांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 22:05 IST

नागपुरात ठेवीदारांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासूनच येस बँकेचे सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालय आणि खामला, रामदासपेठ व सीए रोडवरील शाखेत पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केली.

ठळक मुद्देबँकेवर प्रशासकाची नियुक्ती५० हजारांपर्यंत विड्रॉलची परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करून पुढील आदेशापर्यंत खातेदारांना ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास बंदी घातली आहे. हे वृत्त धडकताच खातेदार आणि ठेवीदारांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासूनच बँकेचे सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालय आणि खामला, रामदासपेठ व सीए रोडवरील शाखेत पैसे काढण्यासाठी एकच गर्दी केली. पैसे काढण्यावरून बँकेच्या मुख्यालयात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. जवळपास ५०० पेक्षा जास्त खातेदारांनी विड्रॉल घेतल्याची माहिती आहे.मुख्यालय आणि शाखांमध्ये गर्दी वाढल्याने कॅशियरने दुपारी १.३० वाजता खातेदारांना विड्रॉलसाठी टोकन देणे बंद केल्याने खातेदार चिडले. शिवाय टोकन असलेल्यांना पैसे मिळण्यास उशीर होत असल्याने त्यांनी आपला राग व्यवस्थापकावर काढला.नाव न सांगण्याच्या अटीवर कर्मचारी म्हणाला, उपलब्ध रकमेचे खातेदारांना वाटप केले आहे. प्रत्येकजण ५० हजार रुपये विड्रॉल करीत आहे. रिझर्व्ह बँकेतून रक्कम येईपर्यंत वाट पाहावी लागेल. खातेदारांच्या रोषाचा आम्हाला सामना करावा लागत आहे. ही आमच्यासाठी संकटाची स्थिती आहे. सदर प्रतिनिधीने बँकेच्या मुख्यालयाला भेट देऊन खातेदारांशी चर्चा केली.

व्याज मिळणार नसल्याने संकटबँकेचे सदर निवासी ८३ वर्षीय खातेदार रमेश शर्मा म्हणाले, वर्षापूर्वी बँकेत २० लाख रुपये होते. पण बँकेसंदर्भात उलटसुलट बातम्यानंतर १३ लाख विड्रॉल केले. आता ७ लाख रुपये जमा आहेत. आता व्याज मिळणार नसल्याने संकट आले आहे. भारत ट्रेडचे कर्मचारी सुनील घुटके म्हणाले, विड्रॉलसाठी सकाळी ९ पासून बँकेत आलो आहे. दीड वाजले तरीही पैसे मिळालेले नाहीत. अमित गुप्ता म्हणाले, गावात १५ मार्चला पुतणीचे लग्न आहे. भावाकडून उधार घेतलेले दीड लाख त्याला परत करायचे आहे. बातमीनंतर सकाळी जेवण न करताच बँकेत आलो. दीड वाजता ५० हजार रुपये मिळाले. उर्वरित रक्कम व्याजाने घेऊन भावाला परत करावी लागेल.

खातेदार संजय गावंडे म्हणाले, मुलीच्या दहावीच्या शिक्षणासाठी ७५ हजार रुपये आणि माझे १ लाख रुपये आहेत. दोन विड्रॉलद्वारे एक लाख रुपये मिळाले आहेत. सेवा चांगली असल्याने बँकेत अकाऊंट काढले. आपलेच पैसे विड्रॉल करण्यासाठी तीन तास रांगेत उभा होतो. डी.एस. एन्टरप्राईजेसचे दिनेश सेवक यांनीही बँकेच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. विड्रॉल तातडीने देण्याची मागणी केली. खातेदार कमलाकर करांगळे म्हणाले, तीन तासांपासून टोकन घेऊन बसलो आहे. ५० हजार रुपये देण्यास उशीर करीत आहेत. बँकेत पैसे जमा आहेत. पुढील विड्रॉल कसे होणार, यावर चिंतित आहे.

कर्मचाऱ्यांना जानेवारीचा पगार नाहीबँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ८ तारखेला होतो. पण जानेवारीचा पगार अजूनही मिळालेला नाही. बँक डबघाईस आल्याने जानेवारीसह फेब्रुवारीचा पगार मिळणार वा नाही, याबद्दल शंका आहे. बँकेच्या आर्थिक व्यवहारावर मर्यादा आल्याने कर्मचाऱ्यांची कपात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा नवीन रोजगार शोधावा लागेल, असे मत नाव न सांगण्याच्या अटीवर बँकेच्या कर्मचाऱ्याने लोकमतशी बोलताना सांगितले.

खातेदारांची सकाळपासूनच गर्दी आहे. त्यांना ५० हजारांचे विड्रॉल देत आहोत. बँकेच्या आर्थिक स्थितीवर बोलण्याचा अधिकार नाही. वरिष्ठांशी संपर्क साधा.सचिन निमा, व्यवस्थापक, मुख्यालय.

टॅग्स :bankबँक