शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टात दहा लाख जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:25 IST

घरात एलपीजी सिलेंडर असतानाही राज्यातील हजारो कुटुंबे रेशन कार्डवरून रॉकेल उचलत आहेत. हा गैरप्रकार थांबविण्यासाठी अशा कुटुंबांकडील रेशन कार्डवर ते एलपीजी सिलेंडरधारक असल्याची स्टॅम्पिंग करण्याचा उपक्रम राज्य सरकार राबवित आहे. परंतु, हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. यावर समाधानकारक स्पष्टीकरण सादर करण्यात अपयश आल्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिवांना प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दहा लाख रुपये जमा करण्याचा आदेश बुधवारी देण्यात आला.

ठळक मुद्देराज्य सरकारला आदेश : रेशन कार्डस्वर एलपीजीधारकांची स्टॅम्पिंग संथ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरात एलपीजी सिलेंडर असतानाही राज्यातील हजारो कुटुंबे रेशन कार्डवरून रॉकेल उचलत आहेत. हा गैरप्रकार थांबविण्यासाठी अशा कुटुंबांकडील रेशन कार्डवर ते एलपीजी सिलेंडरधारक असल्याची स्टॅम्पिंग करण्याचा उपक्रम राज्य सरकार राबवित आहे. परंतु, हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. यावर समाधानकारक स्पष्टीकरण सादर करण्यात अपयश आल्यामुळे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिवांना प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दहा लाख रुपये जमा करण्याचा आदेश बुधवारी देण्यात आला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड.ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या तारखेला न्यायालयाने राज्य सरकारची कानउघाडणी करून आतापर्यंत स्टॅम्पिंगचे किती टक्के काम पूर्ण झाले याची विस्तृत माहिती सादर करण्यास सांगितले होते. तसेच, ही माहिती सादर करण्यात अपयश आल्यास संपूर्ण राज्यातील रॉकेल वितरण बंद करण्यात येईल अशी तंबी दिली होती. त्यानुसार, प्रधान सचिवांनी प्रतिज्ञापत्र सादर करून तेल कंपन्यांनी एलपीजीधारक ग्राहकांची माहिती पुरविली नसल्यामुळे रेशन कार्ड स्टॅम्पिंगचे काम रखडले असल्याचे सांगितले. हे स्पष्टीकरण न्यायालयाचे समाधान करू शकले नाही. त्यामुळे प्रधान सचिवांना प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी न्यायालयात १० लाख रुपये जमा करण्याचा आदेश देण्यात आला. तसेच, अलीकडच्या काळात शहरांतील व गावांतील ग्राहकांना किती रॉकेल वाटप करण्यात आले याची आकडेवारी पुढील तारखेला सादर करण्यास सांगून प्रकरणावर ८ आॅगस्ट रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते कडूजी पुंड यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.गरजूंना फटकागेल्या तारखेपर्यंत ९५ लाख रेशन कार्डस्वर स्टॅम्पिंग होणे बाकी होते. केंद्र सरकारनुसार राज्यात सुमारे सव्वादोन कोटी कुटुंबांकडे एलपीजी सिलेंडर आहे. स्टॅम्पिंग संथ गतीने सुरू असल्यामुळे एलपीजी कनेक्शन असलेली कुटुंबेही रेशनकार्डवर अवैधपणे रॉकेल उचलत आहेत. त्याचा फटका गरजू कुटुंबांना बसत आहे. त्यांना आवश्यक रॉकेल मिळत नाही.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGovernmentसरकार