शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

डेंटल सर्जरी पदव्युत्तरच्या निवड यादीवर स्थगिती : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 01:25 IST

डेंटल सर्जरी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता तयार करण्यात आलेली पहिली निवड यादी येत्या १० एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात येऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सीईटी सेल व आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना दिला. ही यादी ५ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार होती. न्यायालयाच्या स्थगनादेशामुळे ही यादी आता जाहीर करता येणार नाही.

ठळक मुद्देएसईबीसी आरक्षणावर आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंटल सर्जरी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता तयार करण्यात आलेली पहिली निवड यादी येत्या १० एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात येऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सीईटी सेल व आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना दिला. ही यादी ५ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार होती. न्यायालयाच्या स्थगनादेशामुळे ही यादी आता जाहीर करता येणार नाही.डेंटल सर्जरी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाला (एसईबीसी) आरक्षण देण्यात आले आहे. त्याविरुद्ध डॉ. शिवांगी रघुवंशी व डॉ. प्रांजली चरडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पूर्वलक्षीप्रभावाने लागू करण्यात आलेल्या या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झाला, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुके्र व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता पहिली निवड यादी जाहीर करण्यास मनाई केली. तसेच, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, राज्य सीईटी सेल, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांना नोटीस बजावून यावर १० एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.या अभ्यासक्रमासाठी आॅक्टोबर-२०१८ मध्ये प्रवेश परीक्षा झाली. राज्य सरकारने त्यानंतर, म्हणजे ३० नोव्हेंबर २०१८ पासून एसईबीसी कायदा लागू केला. असे असताना डेंटल सर्जरी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील १६ टक्के जागा ‘एसईबीसी’साठी आरक्षित करण्यात आल्या. त्यामुळे कायद्यातील कलम १६ (२) मधील तरतुदीचे उल्लंघन झाले. या तरतुदीनुसार ‘एसईबीसी’ आरक्षण पूर्वलक्षीप्रभावाने लागू करता येत नाही. तसेच, हे आरक्षण घटनाबाह्य आहे असे सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdoctorडॉक्टर