शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांमध्ये दाताचे आजार वाढत आहेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:11 IST

- चॉकलेट खाणे घातकच : हिरड्यांच्या वेदना, मधुमेहास ठरतेय कारणीभूत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : टेस्टी टेस्टी चॉकलेट प्रत्येक ...

- चॉकलेट खाणे घातकच : हिरड्यांच्या वेदना, मधुमेहास ठरतेय कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : टेस्टी टेस्टी चॉकलेट प्रत्येक वयोगटाला आकर्षित करतात. जणू चॉकलेट फस्त करण्याची स्पर्धाच लागली आहे. विविध ब्रॅण्ड्सनेही पसंतीला अनुरुप आकर्षित करणाऱ्या वेस्टनाने नागरिकांना भुरळ पाडण्यास सुरुवात केली आहे. दररोज टीव्हीवर झळकणाऱ्या जाहिरातींनी तर ग्राहक आपसूकच चॉकलेटकडे वळतो आहे. एवढेच नव्हे तर सणासुदीला घरी बनणाऱ्या मिष्ठान्नांची जागाही हे चॉकलेट्स घेत आहेत; मात्र हे चॉकलेट्स आरोग्यासाठी घातक आहेत, याकडे दुर्लक्ष होत आहे. लहान मुलांमध्ये तर लहानपणापासूनच चेहऱ्याच्या सौंदर्यात अत्याधिक महत्त्वाचा भाग असलेल्या दातांचे आजार वाढत असल्याचे दिसून येते.

चॉकलेट्स न खाल्लेलेच बरे

चॉकलेट कमी किंवा जास्त खाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चॉकलेटमध्ये असलेल्या चिकटपणामुळे ते दातावर बराच वेळ चिकटलेले असतात आणि मग त्याचे ॲसिडमध्ये रुपांतरण होते. हे ॲसिड हळूहळू दात पोखरतात. त्याला आपण कीड लागल्याचे संबोधतो.

इनॅमल स्ट्रक्चर निघून जाते

दातावर असलेले इनॅमल स्ट्रक्चर चॉकलेट्स दातांना चिकटल्यामुळे नष्ट होते. हे इनॅमल स्ट्रक्चर दाताचे संरक्षक कवच म्हणून काम करते. संरक्षक कवचच नष्ट झाल्यावर कीड लागण्यासारख्या परिणामांना पुढे जावे लागते. लहान मुलांना तर अधिकच त्रास होतो.

कीड लागलेले दात सौंदर्याला बाधक

मोत्यांसारखे दात असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. लहान मुलांचे हास्य दातांमुळेच अधिक शोभून दिसते; मात्र लहान मुले चॉकलेटला जास्त भूलतात आणि ते अधिक खाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे दात किडणे, खराब होणे किंवा झिजणे असे प्रकार घडतात. ते दिसायला कुरूप दिसतात.

ब्रश करणे किंवा चूळ भरणे

चॉकलेट खाल्ल्यावर लगेच ब्रश करणे किंवा चूळ भरणे गरजेचे आहे. माऊथ वॉश केले तर ते आणखीनच चांगले. त्यामुळे अन्य विषाणूही मरतात.

टिथ फिलिंग, रूट कॅनल, दात बदलणे

कीड लागली की खराब झालेले दात टिथ फिलिंगने भरून काढावे लागते. फार आतपर्यंत कीड गेली असेल तर रुट कॅनल करण्याशिवाय पर्याय नसतो आणि दात पूर्णच खराब झाले तर ते काढून नकली दात बसवावे लागतात. चॉकलेट खाल्ल्याने आपले ओरिजनल दात गमवावे लागून नकली दात बसवणे, हे त्रासदायकच ठरते.

चॉकलेट खाणे निश्चितच चांगले नाही. दात खराब होण्यासोबतच मधुमेह होण्यास कारणीभूत ठरते. चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते आणि केमिकल्सही असतात. प्रारंभी त्यांचा परिणाम जाणवत नाही; मात्र कालांतराने तुम्ही आजाराला आमंत्रित केले आहे, हे त्यानंतर जाणवणाऱ्या लक्षणांनी स्पष्ट होते. हिरडे खराब झाले तर बोबडे होण्याची शक्यताही जास्त असते.

- डॉ. रामकृष्ण शेणॉय, दंतराेग विशेषज्ज्ञ

......................