शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 20:31 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याविरुद्ध चांदूर बाजारमधील खुनी हल्ला प्रकरणात पुढील आदेशापर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली. त्यामुळे कडू यांना अंतरिम दिलासा मिळाला.

ठळक मुद्देहायकोर्ट : चांदूर बाजारमधील खुनी हल्ला प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याविरुद्ध चांदूर बाजारमधील खुनी हल्ला प्रकरणात पुढील आदेशापर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली. त्यामुळे कडू यांना अंतरिम दिलासा मिळाला.फिर्यादी गोपाल तिरमारे यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी ९ फेब्रुवारी २०१८ रोजी बडू यांच्यासह एकूण पाच आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, १२०-ब, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. तो एफआयआर रद्द करण्यासाठी कडू यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अर्जावर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला. तसेच, चांदूर बाजार पोलीस व फिर्यादी गोपाल तिरमारे यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले.एफआयआरनुसार, तिरमारे यांनी कडू यांच्याविरुद्ध आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्याचा राग कडू यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना तिरमारे यांच्याविरुद्ध चिथावणी दिली. त्यातून आरोपींनी तिरमारे यांच्यावर त्यांना ठार मारण्याचा उद्देशाने लोखंडी रॉड व इतर शस्त्रांनी हल्ला केल. ही घटना ७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. न्यायालयात कडू यांच्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. अब्दुल सुभान यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयBacchu Kaduबच्चू कडू