शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळात डेंग्यूची चाचणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:31 IST

डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅन्टीबायोटिक किंवा अ‍ॅन्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो, असे असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या तीन दिवसांपासून डेंग्यूची चाचणी बंद आहे. रुग्णांना बाहेरून चाचणी करण्यास सांगितले जात असून गरीब रुग्णांवर पदरमोड करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देतपासणीसाठी रुग्णांचे नमुने जात आहेत बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅन्टीबायोटिक किंवा अ‍ॅन्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो, असे असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या तीन दिवसांपासून डेंग्यूची चाचणी बंद आहे. रुग्णांना बाहेरून चाचणी करण्यास सांगितले जात असून गरीब रुग्णांवर पदरमोड करण्याची वेळ आली आहे.एकीकडे सण उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे डेंग्यू गंभीर रूप धारण करीत आहे. डेंग्यू डासांची पैदास पाच एमएल पाण्यातही होत असल्याने घराघरांमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण दिसून येत आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक प्रभागावर लक्ष्य करून कीटकनाशक फवारणी, पाणी साचून असलेले टाके, ड्रम रिकामे करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचा किती फायदा होतो तो लवकरच दिसणार असला तरी तूर्तास रुग्णांची संख्या दिवसेगणीक वाढत आहे. मोठ्या संख्येत रुग्ण खासगी रुग्णालयांसह मेयो, मेडिकलमध्ये येत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मेडिकलमध्ये रोज १५ ते २० डेंग्यू संशयित रुग्ण उपचारासाठी येतात. या आजाराचे निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी महत्त्वाची ठरते. परंतु गेल्या तीन दिवसांपासून चाचणी बंद पडल्याने रुग्णांना बाहेरून तपासणी करण्यास सांगितले जात आहे.उपराजधानीत डेंग्यूने गाठली शंभरीडेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी घराघरांतील कूलर्स, पाण्याचे टाके, फुलदाणी, कुंड्या, टायर्समध्ये साचलेले पाणी डासांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरत आहे. अशा दूषित घरांवर कारवाईसाठी महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला आता अधिकार देण्यात आले आहे. काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्यातरी डेंग्यूवर नियंत्रण नसल्याने रुग्णांची वाढतच जात आहे. शहरात एकट्या आॅगस्ट महिन्यात ७० रुग्णांची नोंद झाली आहे. तर जानेवारी ते आतापर्यंत रुग्णांची संख्या १००वर पोहचली आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdengueडेंग्यू