शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू : शासन मंजुरी नसतानाही सभापतींचे फौजदारी कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:18 IST

महापालिकेने डेंग्यू, मलेरिया संदर्भात तयार केलेल्या नियमावलीला राज्य शासनाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही महापालिकेचे आरोग्य सभापती मनोज चाफले यांनी ज्या घरांमध्ये लारवी आढळली, त्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. या निर्देशांची अंमलबजावणी कशी करावी, असा प्रश्न आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडला आहे.

ठळक मुद्देसमन्वयाचा अभाव : शहरातील डेंग्यूला आळा कसा बसणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने डेंग्यू, मलेरिया संदर्भात तयार केलेल्या नियमावलीला राज्य शासनाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही महापालिकेचे आरोग्य सभापती मनोज चाफले यांनी ज्या घरांमध्ये लारवी आढळली, त्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. या निर्देशांची अंमलबजावणी कशी करावी, असा प्रश्न आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडला आहे.शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. याचा विचार करता महापौर नंदा जिचकार यांनी गुुरुवारी आरोग्य विभागाची बैठक घेतली. यात डेंग्यूला आळा घालण्याचे निर्देश दिले. या बैठकीला मनोज चाफले उपस्थित होते. त्यानंतरही त्यांनी शुक्रवारी पुन्हा आरोग्य समितीची बैठक घेऊ न फौजदारी कारवाईचे निर्देश दिले. यातून पदाधिका ऱ्यांत समन्वय नसल्याचे दिसून येते.डेंग्यूला आळा घालण्यासाठी राहत्या घरी व परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. याशिवाय शाळांमधूनही जनजागृती होणे आवश्यक आहे. डेंग्यूची अळी (लारवी) पाण्यात वाढते. त्यामुळे घराजवळ अथवा परिसरात कुठेही पाणी साचून राहू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. असे आवाहन करतानाच तपासणी पथकातर्फे करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ज्यांच्या घरी अथवा कार्यालय परिसरांमध्ये लारवी आढळेल त्यांच्यावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करून त्यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात यावीत, असे निर्देश चाफले यांनी दिले.बैठकीला समितीचे उपसभापती विजय चुटेले, सदस्य लखन येरवार, विशाखा बांते, गार्गी चोपरा, दिनेश यादव, वंदना चांदेकर, अपर आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, डॉ. विजय जोशी, हत्तीरोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे, कनक रिसोर्सेसचे कमलेश शर्मा यांच्यासह दहाही झोनचे आरोग्य विभागाचे झोनल अधिकारी उपस्थित होते.इंदूरच्या धर्तीवर काम करास्वच्छतेमध्ये इंदूर अव्वल क्रमांकावर आहे. इंदूरच्या धर्तीवर नागपूर स्वच्छ करायचे असेल तर इंदूरप्रमाणे स्वच्छतेचे नियोजन करणे व योग्य कारवाई करणे आवश्यक असल्याने यावर चर्चा करण्यात आली. गणेश विसर्जनादरम्यान झोननिहाय कृत्रिम तलाव, टँकचा आढावा घेतला. गणेशोत्सवादरम्यान विसर्जनस्थळी स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याची सूचना बैठकीत करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdengueडेंग्यू