शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नागपुरात नगरसेवकांच्याच घरी डेंग्यूच्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:44 PM

डासांच्या प्रादुर्भावाला घेऊन उच्च न्यायालयाने नगरसेवकांना फटकारले आहे, असे असताना नगरसेवकांच्याच घरी डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या कन्येला व भाजपाचे उपनेता व माजी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्या मुलाला डेंग्यूचे निदान झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. परंतु याच विभागाच्या चमूने यांच्या घरी जाऊन तपासणी केली असता चक्क डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे कुणाला जबाबदार धरावे, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

ठळक मुद्देजबाबदार कोण? : संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डासांच्या प्रादुर्भावाला घेऊन उच्च न्यायालयाने नगरसेवकांना फटकारले आहे, असे असताना नगरसेवकांच्याच घरी डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या कन्येला व भाजपाचे उपनेता व माजी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्या मुलाला डेंग्यूचे निदान झाल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. परंतु याच विभागाच्या चमूने यांच्या घरी जाऊन तपासणी केली असता चक्क डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे कुणाला जबाबदार धरावे, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.एकीकडे सण उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे डेंग्यू गंभीर रुप धारण करीत आहे. डेंग्यूसदृश आजराचे तर घराघरांमध्ये रुग्ण दिसून येत आहे. डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. यामुळे आजार गंभीर होताच थेट जीवाला धोका निर्माण होतो. सध्या शहरात १०५ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जोशी यांच्या मुलीला डेंग्यू झाल्याचे वृत्त झळकताच खळबळ उडाली. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने ते राहात असलेल्या लक्ष्मीनगरातील निवासस्थानाची पाहणी केली. त्यावेळी जोशी यांच्या घरातील कुंडीतच डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. जोशी यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. यातच शुक्रवारी बाल्या बोरकर यांच्या मुलाला डेंग्यू झाल्याचे निदान झाल्याचे समोर येताच चर्चेला पेव फुटले आहे. मुलाला डेंग्यू होण्यापूर्वी त्यांच्या छापरू नगर गरोबा मैदान येथील घरात आरोग्य विभागाला डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या होत्या. विशेष म्हणजे, डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्यावतीने घराघरांची झाडाझडती घेतली जात आहे. परंतु अपुºया कर्मचाऱ्यांमुळे विभागाचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे वास्तव आहे. यातच वारंवार तपासणीत एकाच घरात डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असताना त्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या विभागाला नाही. यामुळे केवळ जनजागृतीच्या भरवशावर हा विभाग डेंग्यूवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. मुंबईमध्ये मात्र डेंग्यूच्या अळ्या आढळून येणाऱ्या घरांवर दंडात्मक कारवाई केली जाते. नागपूरमध्ये तसे अधिकार या विभागाला देण्याबाबतचा प्रस्ताव आहे, परंतु लोकप्रतिनिधींचा उदासीनपणामुळे त्याला मंजुरी मिळाली नाही. परीणामी, अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत शहराला डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत ढकलले जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdengueडेंग्यू