शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
4
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
5
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
6
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
7
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
8
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
9
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
10
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
11
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
12
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
13
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
14
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
15
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
16
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
17
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
19
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर

नागपूर शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये पसरतोय डेंग्यू

By सुमेध वाघमार | Updated: June 21, 2024 18:28 IST

-मागील वर्षीच्या तुलनेत चारपट अधिक रुग्ण

सुमेध वाघमारे, नागपूर : पावसाला अद्याप सुरूवात झाली नाही. परंतु डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. विशेषत: ग्रामीण भागात रुग्ण मागील वर्षीच्या तुलनेत चारपट वाढले आहेत. जानेवारी ते मे या कालावधीत २७ रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 

‘एडीस इजिप्ती’ प्रजातीच्या डासाच्या मादीद्वारे डेंग्यूचा संसर्ग पसरतो. हे डास चिकनगुनिया, पिवळा ताप आणि झिका विषाणूच्या संक्रमणास देखील कारणीभूत ठरतात. डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. यामुळे वेळीच निदान गरजेचे असते. आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मे २०२३मध्ये नागपूर शहरात १७ रुग्ण तर या वर्षी आतापर्यंत १२ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणमध्ये जानेवारी ते मे २०२३ मध्ये ६ रुग्ण असताना या वर्षी २७ रुग्ण आढळून आले. मे महिन्यात रुग्णांची संख्या वाढल्याने आणि जुलै ते सप्टेंबर हे पावसाचे महिने राहणार असल्याने स्थिती चिंताजनक होण्याची भिती वर्तवली जात आहे. 

-नागपूर विभागात २३७ रुग्णांची नोंद

नागपूर विभागांतर्गत येत असलेल्या सहा जिल्ह्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत २३७ रुग्णांची नोंद झाली. मागील वर्षी या कालावधीत केवळ ६० रुग्ण होते. या वर्षी सर्वाधिक रुग्ण चंद्रपूरमध्ये दिसून आले. या जिल्ह्यात ८२ रुग्णांची नोंद झाली. याशिवाय, वर्धेत ४६, गोंदियामध्ये ३८, गडचिरोलीमध्ये ३२, नागपूर ग्रामीणमध्ये २७ तर नागपूर शहरमध्ये २७ रुग्ण आढळून आले. 

 -डेंग्यूपासून असा करा बचाव

- लहान मुलांना पूर्ण हातांचे कपडे घाला- कुलरच्या टाकीत पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या- घरात व आसपासच्या परिसरात स्वच्छता ठेवा व कोठेही पाणी साठू देऊ नका- रात्री झोपताना मछरदाणीचा वापर करा.- लहान मुलांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.- कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा

टॅग्स :dengueडेंग्यू