शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

देना बँकेच्या घोटाळ्यातील सूत्रधार बिल्डरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:52 PM

कॅश क्रेडिट (सीसी) लिमिट मिळवून देना बँकेची दोन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर समीर चट्टेला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देअपघातात झाला होता जखमी : घटनेच्या तीन महिन्यानंतर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कॅश क्रेडिट (सीसी) लिमिट मिळवून देना बँकेची दोन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर समीर चट्टेला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १८ जूनला चट्टे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ३ मार्च २०१८ रोजी मा अनसूया ट्रेडिंग कंपनीचे संचालक गांधीनगर येथील रहिवासी दिलीप मोरेश्वर कलेले यांनी देना बँकेत दोन कोटी रुपयांच्या कॅश क्रेडिटसाठी (सीसी) अर्ज केला. कलेले यांनी आपला प्लास्टिक टेबल-खुर्चीचा व्यापार असल्याचे सांगितले. बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक चंद्रकांत अनगरे यांनी ३ मार्च ते २१ मार्च २०१६ दरम्यान कलेले यांच्या फर्मला दोन कोटींची रक्कम जारी केली होती. ही रक्कम कलेले यांच्या फर्मपासून मेसर्स अरेना इंडस्ट्रीजचे भागीदार समीर भास्कर चट्टे, मेहुल रजनीकांत धुवाविया, एमबीके अपार्टमेंट, वैष्णोदेवी चौक आणि मा तुळजा भवानी ट्रेडिंग कार्पोरेशनच्या खात्यात ट्रान्सफर करून काढण्यात आली होती. बँकेचे सध्याचे व्यवस्थापक मो. शफी हैदर यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने तपास सुरु केला. तपासात कलेले आणि समीर चट्टे नातेवाईक असल्याची माहिती मिळाली. सीसी लिमिटच्या मोबदल्यात अनिता अरुण नागभीडकरने एनआयटीने लीजवर दिलेली संपत्ती एनआयटीच्या मंजुरीविना गहाण ठेवली होती. सीसी लिमिट घेण्यासाठी सीए फर्म एस. एम. कोठावाला अँड असोसिएटने बनावट बॅलेन्स शीट तयार करून २०१६-१७ च्या व्यवसायात १०० टक्के वाढ दाखविली होती. गुन्हेशाखा पोलिसांनी १६ जूनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचीमाहिती मिळताच समीर चट्टे फरार झाला. अपघातात त्याच्या चालकाचा मृत्यू होऊनतोजखमीझाला होता. न्यायालयात अग्रीम जमानत मिळविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे तो फरार होता. या प्रकरणात ही दुसरी अटक असून मेहुल धुवाविया, इतर आरोपी शहरातच लपल्याची माहिती आहे.१०० कोटींची सत्यता दडपलीया घोटाळ्यानंतर गुन्हे शाखेने १९ प्रकरणात १०० कोटींची फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. यात सीए फर्म अजय-अमर असोसिएटचे नाव पुढे आले होते. पोलिसांनी आगामी दिवसात दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तीन महिन्यानंतर गुन्हे शाखा पोलीस आणि बँक अधिकाºयांनी काहीच कारवाई केली नाही. सूत्रांनुसार काही दिवसांपासून पोलीस, बँक आणि आरोपींमध्ये समझोता झाला. यामुळेच हा घोटाळा थंडबस्त्यात टाकण्यात आला. याचा स्वतंत्र तपास केल्यास खळबळ उडू शकते.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटक