शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शासकीय कर्मचाऱ्यांचे शक्ती प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:07 IST

सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला तीन दिवसीय संप मंगळवारी पहिल्याच दिवशी यशस्वी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. नागपुरातील संविधान चौकात सरकारी कर्मचाऱ्यांनी शक्तिप्रदर्शन करून, सरकारवर दबाव बनविण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण सरकारी यंत्रणा आज रस्त्यावर असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. यामुळे प्रशासकीय कामे खोळंबली. शिक्षक संपात सहभागी झाल्यामुळे बहुतांश शाळांमध्ये सुटीचे वातावरण होते. शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेला फटका बसला.

ठळक मुद्देशासकीय कार्यालयात शुकशुकाटअनेक शाळा बंद शासकीय रुग्णसेवेला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला तीन दिवसीय संप मंगळवारी पहिल्याच दिवशी यशस्वी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. नागपुरातील संविधान चौकात सरकारी कर्मचाऱ्यांनी शक्तिप्रदर्शन करून, सरकारवर दबाव बनविण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण सरकारी यंत्रणा आज रस्त्यावर असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. यामुळे प्रशासकीय कामे खोळंबली. शिक्षक संपात सहभागी झाल्यामुळे बहुतांश शाळांमध्ये सुटीचे वातावरण होते. शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेला फटका बसला.संपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांच्या २३ संघटना व १० संयुक्त कृती समितीने मंगळवारी संविधान चौकात भव्य धरणे कार्यक्रम घेतला. दीड हजारावर कर्मचारी सकाळी ९ वाजतापासून जमले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रहास सुटे यांच्या अध्यक्षतेत सभा झाली. या वेळी तीन दिवसाच्या संपावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.संपात आरोग्य विभागातील परिचारिका, अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका, सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, लिपीक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारतीतील सरकारी कार्यालये, विभागीय आयुक्त कार्यालय, सामाजिक न्याय भवन, या कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला होता. काही शिक्षक संघटनांनी संपात सक्रिय सहभाग घेतला होता, तर काही संघटनांनी संपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे २० टक्के शाळा बंद होत्या. संपात सहभागी न होता फक्त पाठिंबा देणाºया शिक्षकांनी काळ्या फिती लावून अध्यापनाचे काम केले. आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयाच्या परिचारिका, फार्मासिस्ट, शिपाई, शासकीय वाहनावरील ड्रायव्हर, लिपीक संपात सहभागी झाल्याने त्याचा फटका रुग्णसेवेला बसला. शासकीय कामकाजासाठी सरकारी कार्यालयात येणाºया नागरिकांना कर्मचाºयांअभावी रिकाम्या हाताने परतावे लागले. प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांचे परमीट, वाहन हस्तांतरण, शुल्क आकारणी या सर्व प्रक्रिया बंद पडल्या होत्या. अधिकाºयांचा संपात सहभाग नव्हता. मात्र, त्यांच्या अधिपत्याखाली काम करणारे कर्मचारी व शिपाई संपावर गेल्याने अधिकारीही हतबल झाले होेते.सरकारने तोडगा काढावा संपात २३ शासकीय कर्मचारी संघटना आणि १० संयुक्त समितीचे सर्व सदस्य सहभागी झाले. पहिल्याच दिवशी शासकीय यंत्रणेवर मोठा परिणाम झाला. तीन दिवस हीच स्थिती कायम राहील. शासनासोबत आमची चर्चा अजूनही सुरू आहे. आजच्या परिणामाची दखल घेऊन सरकारने त्यावर तोडगा काढावा. चंद्रहास सुटे,अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र 

 

टॅग्स :StrikeसंपEmployeeकर्मचारी