शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 21:52 IST

पाचपावलीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये सात ते आठ गुंडांनी शनिवारी रात्री हैदोस घातला. रिसेप्शन काऊंटर, कॉफी मशीन, टीव्ही, मॉनिटर आणि इतर वस्तूंची तोडफोड करीत आरोपी शिवीगाळ करीत पळून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावलीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये सात ते आठ गुंडांनी शनिवारी रात्री हैदोस घातला. रिसेप्शन काऊंटर, कॉफी मशीन, टीव्ही, मॉनिटर आणि इतर वस्तूंची तोडफोड करीत आरोपी शिवीगाळ करीत पळून गेले.पाचपावली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचपावलीत व्हीनस हॉस्पिटल तिसऱ्या माळ्यावर आहे. शनिवारी रात्री १० ते १०.१५ च्या सुमारास सात ते आठ गुंड तोंडावर कपडा बांधून आतमध्ये आले. त्यांच्या हातात दंडुके होते. त्यांनी आरडाओरड करीत रिसेप्शन काऊंटर, टीव्ही, काच, मॉनिटर, थम मशीन, कॉफी मशीन आदीची तोडफोड केली. तसेच खुर्च्यांची फेकाफेक केली. या प्रकारामुळे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली. आरोपी आरडाओरड करीत होते कर्मचाºयांनी पाचपावली पोलिसांना ही माहिती कळविली. त्यानंतर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मात्र तत्पूर्वीच आरोपी तिथून पळून गेले होते. पोलिसांनी आरोपीबाबत विचारणा केली असता डॉक्टर किंवा तेथील कर्मचारी यांनी आरोपींपैकी कुणालाही आम्ही ओळखत नसल्याचे सांगितले. ही घटना कशामुळे घडली ते जाणून घेण्याचा पोलिसांनी पहाटे ३ वाजेपर्यंत प्रयत्न केला. मात्र हॉस्पिटलच्या संचालकांनी घटनेच्या कारणाबाबत अनभिज्ञता दर्शविली. शैलेंद्र गोविंदराव सोनारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.सीसीटीव्ही बंदया घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी वरच्या मजल्यावरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात आरोपी स्कार्फ बांधून असल्यामुळे कुणाचीही ओळख पटू शकली नाही. विशेष म्हणजे हॉस्पिटलच्या खालच्या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज बंद असल्यामुळे आरोपी कशाने आले आणि कुठून कुठे पळून गेले तेसुद्धा स्पष्ट होऊ शकले नाही.

 

 

व्हीनस हॉस्पिटलमध्ये तोडफोडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावलीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये सात ते आठ गुंडांनी शनिवारी रात्री हैदोस घातला. रिसेप्शन काऊंटर, कॉफी मशीन, टीव्ही, मॉनिटर आणि इतर वस्तूंची तोडफोड करीत आरोपी शिवीगाळ करीत पळून गेले.पाचपावली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचपावलीत व्हीनस हॉस्पिटल तिसऱ्या माळ्यावर आहे. शनिवारी रात्री १० ते १०.१५ च्या सुमारास सात ते आठ गुंड तोंडावर कपडा बांधून आतमध्ये आले. त्यांच्या हातात दंडुके होते. त्यांनी आरडाओरड करीत रिसेप्शन काऊंटर, टीव्ही, काच, मॉनिटर, थम मशीन, कॉफी मशीन आदीची तोडफोड केली. तसेच खुर्च्यांची फेकाफेक केली. या प्रकारामुळे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली. आरोपी आरडाओरड करीत होते कर्मचाºयांनी पाचपावली पोलिसांना ही माहिती कळविली. त्यानंतर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मात्र तत्पूर्वीच आरोपी तिथून पळून गेले होते. पोलिसांनी आरोपीबाबत विचारणा केली असता डॉक्टर किंवा तेथील कर्मचारी यांनी आरोपींपैकी कुणालाही आम्ही ओळखत नसल्याचे सांगितले. ही घटना कशामुळे घडली ते जाणून घेण्याचा पोलिसांनी पहाटे ३ वाजेपर्यंत प्रयत्न केला. मात्र हॉस्पिटलच्या संचालकांनी घटनेच्या कारणाबाबत अनभिज्ञता दर्शविली. शैलेंद्र गोविंदराव सोनारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.सीसीटीव्ही बंदया घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी वरच्या मजल्यावरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात आरोपी स्कार्फ बांधून असल्यामुळे कुणाचीही ओळख पटू शकली नाही. विशेष म्हणजे हॉस्पिटलच्या खालच्या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज बंद असल्यामुळे आरोपी कशाने आले आणि कुठून कुठे पळून गेले तेसुद्धा स्पष्ट होऊ शकले नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी