शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये संत्र्यांच्या स्वादिष्ट पदार्थांचे ‘डेमॉस्ट्रेशन’; मास्टर शेफ विक्की रतनानींनी दिल्या टीप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 11:50 IST

देशातील सेलेब्रेटी मास्टर शेफ विक्की रतनानी यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची शोभा वाढवली. त्यांनी नागपुरात येऊन येथील महिलांना संत्र्यांपासून स्वादिष्ट पदार्थ कसे तयार करायचे, याच्या महत्त्वपूर्ण टीप्स दिल्या.

ठळक मुद्देयवतमाळ हाऊस येथे दिलखुलास दिली प्रश्नांना उत्तरे

आॅनलाईन लोकमतनागपूर : हा कार्यक्रम रहाटे कॉलनीतील यवतमाळ हाऊस येथे झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी रतनानी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, उपसरव्यवस्थापक आशिष जैन, अध्यक्ष (विक्री) करुण गेरा आदी उपस्थित होते. रतनानी यांचे देशभरात नाव आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची सुवर्णसंधी पाककलेची आवड असणाऱ्या महिलांनी गमावली नाही. रतनानी यांच्याकडून संत्र्यांपासून स्वादिष्ट पदार्थ तयार करण्याच्या टीप्स घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. रतनानी यांनी नागपूर आॅरेंज अ‍ॅन्ड सोय ग्लेझ्ड कॉटेज व आॅरेंज सिटी विन्टर रिसोट्टो हे दोन पदार्थ तयार करून दाखवले. दोन्ही पदार्थांमध्ये संत्र्यांचा उपयोग करण्यात आला. अनेक महिलांनी त्या पदार्थांची चव चाखून रतनानी यांची प्रशंसा केली. दरम्यान, महिलांनी रतनानी यांना विविध प्रश्न विचारून शंकांचे समाधान करून घेतले, तसेच नेहमी अडचणीच्या ठरणाऱ्या काही गोष्टींवर उपाय विचारून घेतले. रतनानी यांनी सर्वांना दिलखुलास उत्तरे दिली. ज्येष्ठ नागरिक तारादेवी चोरडिया यांच्यासह अपर्णा चौधरी यांनी स्वत: तयार केलेले पदार्थ रतनानी यांना भेट दिले. रतनानी यांनी त्यांच्या पदार्थांचे कौतुक केले. कार्यक्रम संपल्यानंतर रतनानी यांनी महिलांसोबत सेल्फी काढून घेतली, तसेच अनेक महिलांनीही स्वतंत्रपणे रतनानी यांच्यासोबत सेल्फीज काढून घेतल्या. सविता संचेती यांनी प्रास्ताविक केले. पूनम कुकरेजा यांनी संचालन केले. अर्चना झवेरी व शालिनी गुप्ता यांनी आभार व्यक्त केले.

विजय दर्डा यांच्या प्रश्नाने वाढली रंगतलोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्या एका प्रश्नाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांनी हे क्षेत्र महिलांचे असताना त्यात पुरुष पुढे कसे? अशी विचारणा केली. त्यावर रतनानी यांनी विनोदी उत्तर दिले. कोणत्याही पुरुषाला त्याची पत्नी दुसऱ्याच्या स्वयंपाकघरात तासन्तास राबावी, हे सहन होणार नाही. त्यामुळे पुरुषांनीच या क्षेत्रात आघाडी घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये जोरदार हशा पिकला.

 

 

 

 

 

 

 

 

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये संत्र्यांच्या स्वादिष्ट पदार्थांचे ‘डेमॉस्ट्रेशन’; मास्टर शेफ विक्की रतनानींनी दिल्या टीप्सयवतमाळ हाऊस येथे दिलखुलास दिली प्रश्नांना उत्तरेआॅनलाईन लोकमतनागपूर : देशातील सेलेब्रेटी मास्टर शेफ विक्की रतनानी यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची शोभा वाढवली. त्यांनी नागपुरात येऊन येथील महिलांना संत्र्यांपासून स्वादिष्ट पदार्थ कसे तयार करायचे, याच्या महत्त्वपूर्ण टीप्स दिल्या. हा कार्यक्रम रहाटे कॉलनीतील यवतमाळ हाऊस येथे झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी रतनानी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, उपसरव्यवस्थापक आशिष जैन, अध्यक्ष (विक्री) करुण गेरा आदी उपस्थित होते. रतनानी यांचे देशभरात नाव आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची सुवर्णसंधी पाककलेची आवड असणाºया महिलांनी गमावली नाही. रतनानी यांच्याकडून संत्र्यांपासून स्वादिष्ट पदार्थ तयार करण्याच्या टीप्स घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. रतनानी यांनी नागपूर आॅरेंज अ‍ॅन्ड सोय ग्लेझ्ड कॉटेज व आॅरेंज सिटी विन्टर रिसोट्टो हे दोन पदार्थ तयार करून दाखवले. दोन्ही पदार्थांमध्ये संत्र्यांचा उपयोग करण्यात आला. अनेक महिलांनी त्या पदार्थांची चव चाखून रतनानी यांची प्रशंसा केली. दरम्यान, महिलांनी रतनानी यांना विविध प्रश्न विचारून शंकांचे समाधान करून घेतले, तसेच नेहमी अडचणीच्या ठरणाºया काही गोष्टींवर उपाय विचारून घेतले. रतनानी यांनी सर्वांना दिलखुलास उत्तरे दिली. ज्येष्ठ नागरिक तारादेवी चोरडिया यांच्यासह अपर्णा चौधरी यांनी स्वत: तयार केलेले पदार्थ रतनानी यांना भेट दिले. रतनानी यांनी त्यांच्या पदार्थांचे कौतुक केले. कार्यक्रम संपल्यानंतर रतनानी यांनी महिलांसोबत सेल्फी काढून घेतली, तसेच अनेक महिलांनीही स्वतंत्रपणे रतनानी यांच्यासोबत सेल्फीज काढून घेतल्या. सविता संचेती यांनी प्रास्ताविक केले. पूनम कुकरेजा यांनी संचालन केले. अर्चना झवेरी व शालिनी गुप्ता यांनी आभार व्यक्त केले.विजय दर्डा यांच्या प्रश्नाने वाढली रंगतलोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्या एका प्रश्नाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांनी हे क्षेत्र महिलांचे असताना त्यात पुरुष पुढे कसे? अशी विचारणा केली. त्यावर रतनानी यांनी विनोदी उत्तर दिले. कोणत्याही पुरुषाला त्याची पत्नी दुसºयाच्या स्वयंपाकघरात तासन्तास राबावी, हे सहन होणार नाही. त्यामुळे पुरुषांनीच या क्षेत्रात आघाडी घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये जोरदार हशा पिकला.

 

 

 

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर