शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘आपली बस’ सुरू करण्याची मागणी : नागरिकांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 20:49 IST

शहरातील जवळपास सर्वच बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारासोबतच रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आपली बसची गरज भासत असून आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील जवळपास सर्वच बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारासोबतच रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आपली बसची गरज भासत असून आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर शहरातील आपली बसची चाके थांबली. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवांशिवाय इतर कार्यालये, बाजार बंद झाल्यामुळे नागरिकांचे बाहेर निघणे थांबले होते. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू सर्व बाजार आणि कार्यालये सुरू होत आहेत. नागरिकही आपल्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु त्यांना आपल्या घरून बाजारात किंवा कार्यालयात जाण्यासाठी स्टार बस उपलब्ध नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना घरून बाजारात जावयाचे असल्यास ते दुचाकीवर जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत त्यांना आपली बसची गरज भासत आहे. परंतु आपली बसच्या फेऱ्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे....तर बस होतील खराबजवळपास पाच महिन्यापासून आपली बस एकाच ठिकाणी उभ्या आहेत. एकाच ठिकाणी बसेस उभ्या असल्यामुळे त्या खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत बसेसची वाहतूक सुरू झाल्यास त्यांची देखभाल करता येणे शक्य होणार आहे. महापालिकेलाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत आपली बसची वाहतूक सुरू झाल्यास महापालिकेचे उत्पन्न सुरू होईल.अद्याप काहीच आदेश नाहीतआपली बसच्या वाहतुकीबाबत महापालिकेच्या परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांना विचारणा केली असता, आपली बस सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात राज्य शासनाचा काहीच आदेश आला नसल्याची माहिती त्यांनी दिली.वाडीवरून दररोज येत होतो सीताबर्डीलावाडी येथील रहिवासी रमेश मेश्राम यांनी सांगितले की, ते सीताबर्डी येथील एका कापडाच्या दुकानात काम करतात. ते दररोज आपली बसने ये-जा करीत होते. लॉकडाऊनमध्ये दुकान बंद असल्यामुळे त्यांना त्रास झाला नाही. परंतु आता दुकान सुरू झाल्यामुळे त्यांना वाडीवरून सीताबर्डीला येणे कठीण होत आहे.गोरेवाडा ते सीताबर्डीचा प्रवासही कठीणगोरेवाडा येथील रहिवासी आकाश निकोसे यांनी सांगितले की, ते सीताबर्डीतील मोदी नंबर ३ मधील मोबाईलच्या दुकानात काम करतात. लॉकडाऊनपूर्वी ते आपली बसने ये-जा करीत होते. परंतु आपली बस बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. ऑटोरिक्षाही बंद असल्यामुळे त्वरित आपली बस सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक