शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोविडसाठी ‘एसडीआरएफ’ मधून १०० कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 22:45 IST

Demand for Rs 100 crore from SDRF for Covid नागपूर महानगर व ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पुढील संभाव्य लाटेला लक्षात घेता, राज्य आपत्ती मदत निधीतून (‘एसडीआरएफ’) १०० कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सादर केला आहे.

ठळक मुद्देऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी चार सदस्यीय समिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ग्रामीण भागातील लसीकरणाचा आढावा नरखेड, कुही ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे कार्यादेश जारी इंदोऱ्याच्या आंबेडकर रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महानगर व ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पुढील संभाव्य लाटेला लक्षात घेता, राज्य आपत्ती मदत निधीतून (‘एसडीआरएफ’) १०० कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सादर केला आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळातील कोविड परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘एसडीआरएफ’मधून शंभर कोटी रुपयांचे अतिरिक्त मागणी केली आहे. औषधे, ऑक्सिजन खरेदी, यंत्रसामुग्रीची खरेदी व वैद्यकीय उपाय योजनासाठी या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध औद्योगिक संस्था यांच्याकडे सामाजिक दायित्व निधीची मागणीही जिल्हा प्रशासनाने केली आहे. आतापर्यंत केवळ वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडकडून ११.८८ कोटी प्राप्त झाले आहे. सामाजिक, औद्योगिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात मदतीची जिल्हा प्रशासनाने अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक असून, तो नियंत्रित व समतोल असावा, यासाठी चार सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात व निरीक्षणात ऑक्सिजनचे वितरण होणार आहे.

जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्याबाबतच्या पालकमंत्र्यांच्या सूचनेला पहिला प्रतिसाद नरखेड व कुही तालुक्यात मिळाला असून, या ठिकाणच्या ऑक्सिजन प्लांट निर्मितीचे कार्यारंभ देण्यात आले आहेत. इंदोरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र या ठिकाणीही ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली जाणार असून, १२ तारखेला उद्घाटन होणार आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ४,१३६ रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले. शहरातील १५७ तर ग्रामीणमधील ४९ शासकीय व खासगी रुग्णालयांना रेमडेसिविरचे वाटप करण्यात आले.

शुक्रवारला १११ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा

७ मे रोजी जिल्ह्यात १११ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला. ७६ मेट्रिक टनची गरज होती. ४१ मेट्रिक टन ऑक्सिजनचे वितरण झाले आहे. ऑक्सिजन फीलिंग सेंटरवरून ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील जगदंबा, भरतीया, आदित्य, आसी, रुक्मिणी या ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्लांटमधून १३८ मेट्रिक टनाची क्षमता आहे. त्यापैकी मेयो, मेडिकल, शालिनीताई मेघे, लता मंगेशकर हॉस्पिटल, ॲलेक्सिस हॉस्पिटल, अवंती, क्रिम्स, ऑरेंज सिटी, शुअर टेक, वोक्हार्ट, आशा हॉस्पिटल कामठी, ७१ मेट्रिक टनची गरज असताना, ७० मेट्रिक टन ऑक्सिजन वितरित करण्यात आला आहे.

रात्री पोहोचणार चार टँकर

ओडिसा राज्यातील भुवनेश्वर नजीकच्या अंगुल येथील स्टील प्लांटमधून नागपूरसाठी ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. नागपूरला शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत टँकरचा पुरवठा होणार आहे, याशिवाय काल गुरुवारी पाठविण्यात आलेले चार टँकर शनिवारी रात्री पोहोचणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर