शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३० जुलैपर्यंत नागपुरातील मालमत्ताधारकांना डिमांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:23 IST

शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सायबरटेक सिस्टिम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीने सर्वेक्षणात घोळ घातल्याने एकाच कामासाठी दोन कंपन्या नियुक्त करण्यात आल्या़ अद्यापही सर्वेक्षणाचे काम अपूर्णच आहे़ येत्या महिनाभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. ३० जुलैपर्यंत सर्व मालमत्ताधारकांना कराची देयके अर्थात डिमांड पाठविल्या जाणार असल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे५.२५ लाख मालमत्तांचे सर्वेक्षण : युनिटची संख्या साडेसहा लाखांवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सायबरटेक सिस्टिम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लि. कंपनीने सर्वेक्षणात घोळ घातल्याने एकाच कामासाठी दोन कंपन्या नियुक्त करण्यात आल्या़ अद्यापही सर्वेक्षणाचे काम अपूर्णच आहे़ येत्या महिनाभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. ३० जुलैपर्यंत सर्व मालमत्ताधारकांना कराची देयके अर्थात डिमांड पाठविल्या जाणार असल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.शहरात साडेपाच लाख मालमत्ता असल्याची मनपात नोंद आहे़ प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक मालमत्ता आहेत़ सर्व मालमत्ता कराच्या कक्षेत आणून मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व मालत्तांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले़ सायबरटेक या खासगी कंपनीला हे काम देण्यात आले़ या कंपनीने सर्वेक्षणात मोठा घोळ घातला़ अनेक चुका या सर्वेक्षणात झाल्या़ शिवाय अव्वाच्यासव्वा करआकारणी करण्यात आली़ नव्या पद्धतीने करआकारणी करीत शहरातील १ लाख ३९ हजार नागरिकांना चालू वर्षाच्या कराच्या डिमांड पाठविण्यात आल्या़ यात मालमत्ता कर १० ते १५ पट वाढल्याचे पाहून नागरिक चक्रावून गेले़ याचा कर वसुलीवर परिणाम झाला.नागरिकांचा विरोध विचारात घेता कर दुपटीपेक्षा अधिक वाढणार नाही, असा निर्णय महापालिका सभागृहात घेण्यात आला़ हा सर्व घोळ निस्तरण्यात वर्ष निघून गेले़ तर सायबरटेकला दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करता न आल्यामुळे दोन कंपन्यांकडे काम सोपविण्यात आले़ या कंपन्यांना दिलेली मुदत जुलैला संपत आहे़ या कालावधीत सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल़ तसेच ३० जुलैपर्यंत सर्व मालमत्ताधारकांना कराच्या डिमांड पाठविल्या जातील़ दररोज सात ते आठ हजार मालमत्तांचे असेसमेंट करून डिमांड काढल्या जात असल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली़सभागृहाच्या निर्णयानंतरही जागा भाड्यानेमहापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांची जागा भाड्याने देण्यासंदर्भातील धोरण निश्चित होईपर्यंत कोणतीही शाळा वा परिसरातील जागा भाड्याने दिली जाणार नाही, असा निर्णय महापालिका सभागृहात घेण्यात आला होता. त्यानंतरही मौजा बाभूळखेडा, बॅनर्जी ले-आऊ ट येथील भगावननगर मराठी प्राथमिक शाळा परिसरातील व्यायाम शाळा इमारत व वाचनालय रुख्मन मेमोरियल सोसायटीला शैक्षणिक कार्यासाठी देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर