शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

ग्लेनमार्क फार्माची ४० एकर जागेची मागणी

By admin | Updated: September 28, 2016 03:21 IST

औषध क्षेत्रातील ग्लेनमार्क फार्मा ही भारतीय कंपनी मिहान-सेझमध्ये उत्पादन करण्यास उत्सुक आहे.

मिहान-सेझ : लहान आयटी कंपन्या उत्सुकनागपूर : औषध क्षेत्रातील ग्लेनमार्क फार्मा ही भारतीय कंपनी मिहान-सेझमध्ये उत्पादन करण्यास उत्सुक आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मिहान-सेझची पूर्वीच पाहणी केली असून सेझमध्ये ४० एकर जागेची मागणी केली आहे. कंपनीने यासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (एमएडीसी) प्रस्ताव दिला आहे. काही दिवसातच जागेला मंजुरी मिळणार आहे. एमएडीसीने सेझमध्ये जागेचे दर वाढविले आहेत. आता ६० लाखांऐवजी प्रति एकर जागेचा दर ६९ लाख रुपये एकर आहे. कंपनीला हव्या असलेल्या जागेची एकूण किंमत २७ कोटी ६० लाख एवढी आहे. औषध निर्माण क्षेत्रातील पदवीधर व पदव्युत्तर आणि तज्ज्ञांना या कंपनीत उच्चपदस्थ नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

आयटी कंपन्यांतर्फे जागेची खरेदीमिहान-सेझमध्ये वर्ष २०१६ मध्ये १२ लहानमोठ्या कंपन्यांनी जागा विकत घेतली आहे. मध्यवर्ती इमारतीत आठ आयटी कंपन्या कार्यान्वित झाल्या आहेत. याशिवाय आणखी ३ आयटी कंपन्यांनी मिहान-सेझमध्ये जागेची मागणी केली आहे. या कंपन्यांचा प्रस्ताव सध्या प्रलंबित असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवीन कंपन्यांच्या उद्योग निर्मितीमुळे मिहान-सेझमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचे श्रेय स्थानिक नेत्यांना असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय यावर्षीच्या जुलै महिन्यात एसईझेडबाहेर एनडीएसपी स्पाईसेस आणि एसवायएस लॉजिस्टिकने प्रत्येकी एक एकर जागा खरेदी केली आहे. दुबई येथील नामांकित परफ्यूम उत्पादक कंपनीने एसईझेड या निर्यातीत क्षेत्रात २.५ एकर जागा खरेदी केली आहे.(प्रतिनिधी)‘एचसीएल’ला ५० एकर जागाएवढेच नव्हे तर सप्टेंबर महिन्यात आयटी क्षेत्रातील नामांकित हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेडने (एचसीएल) मिहान-सेझमध्ये ५० एकर जागा खरेदीचा लीज करार केला आहे. या करारामुळे मिहानच्या विकासात पुन्हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. कंपनी मिहानमध्ये स्कील डेव्हलपमेंट सेंटरची उभारणी करणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.भारतातील आघाडीची आयटी कंपनी टीसीएस मिहान-सेझमध्ये आधीच कार्यरत आहे. याशिवाय इन्फोसिसने १४३ एकर जागेवर बांधकाम सुरू केले आहे. तसेच टेक महिन्द्रचे बांधकाम जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ‘एआयएमडीए’तर्फे जागेची पाहणीवैद्यकीय उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या मिहान-सेझमध्ये उत्पादन युनिट सुरू करणार आहेत. या संदर्भात भारतीय वैद्यकीय उपकरणे असोसिएशनच्या (एआयएमडीए) पदाधिकाऱ्यांनी पूर्वीच जागेची पाहणी केली आहे.