शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

‘डेल्टा प्लस’चा अंदाज खोटा ठरला ! ‘डेल्टा’च अधिक धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 12:00 IST

Nagpur News ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’हा वेगाने पसरत असल्याने केंद्र सरकारने ‘विषाणूचा चिंताजनक प्रकार’ घोषित केले आहे.

ठळक मुद्देराज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे मुंबई ७, पुणे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी १ रुग्ण आहे.

 

सुमेध वाघमारे

नागपूर : ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’हा वेगाने पसरत असल्याने केंद्र सरकारने ‘विषाणूचा चिंताजनक प्रकार’ घोषित केले आहे. परंतु राज्यात आढळून येत असलेले याचे रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा विचार केला असता या विषाणूचा प्रकाराबाबतचा अंदाज खोट ठरला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तज्ज्ञाच्या मते, या विषाणूचा आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे.

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताच आता डेल्टा प्लस कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचे कारण ‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट’ असण्याची शक्यता बोलली जात आहे. विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांचा अहवाल एक महिन्यानंतर आता प्राप्त झाला आहे. बहुसंख्य रुग्ण ठणठणीत झाले आहेत. यामुळे विषाणूच्या या प्रकाराबाबत चिंतेचे कारण नसल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

-विदर्भातील चारही रुग्णांकडून संसर्ग नाही

विदर्भात आढळून आलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या चारही रुग्णांकडून संसर्ग झाला नसल्याचे समोर आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व सालेकसा तालुक्यात व अकोला जिल्ह्यामध्ये आढळून आलेला ‘डेल्टा प्लस’चा रुग्णाला सौम्य लक्षणे होती. या तिन्ही रुग्णांनी घरीच राहून उपचार घेतला. हे तिन्ही रुग्ण बरे झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ‘डेल्टा प्लस’चा रुग्णाला मध्यम लक्षणे होती. यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आठवड्याचा उपचारानंतरच रुग्ण बरा झाला. हे सर्व रुग्ण जून महिन्यातील आहेत. या चारही रुग्णांकडून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना संसर्ग झाला नसल्याचे समोर आले आहे. आता त्यांच्या कुटुंबाचा सदस्यांचे नमुने ‘जिनोम सिक्वेंसिंग’साठी पाठविले जाणार आहे.

-कोरोना विषाणूचा बदलेला प्रकार

कोरोनाचा दुसऱ्या लाटेत अत्यंत संक्रामक प्रकार ‘बी .१.६१७.२’ने कहर केला होता. याला ‘डेल्टा’ नाव दिले आहे. आता हा ‘ए व्हाय.१’ या ‘डेल्टा प्लस’मध्ये बदललेला आहे. ‘डेल्टा’पेक्षा ‘डेल्टा प्लस’ हा वेगाने पसरतो, यावर ‘मोनोक्लोनल अ‍ँटिबॉडी’ उपचाराद्वारेदेखील नियंत्रित केले जाऊ शकत नाही, असे बोलले जात होते. परंतु आता पुन्हा यावर विचार केला जात आहे.

-‘डेल्टा’चा तुलनेत ‘डेल्टा प्लस’ कमी धोकादायक

, ‘डेल्टा’च्या तुलनेत ‘डेल्टा प्लस’ हा कमी धोकादायक आहे. तसा ‘डाटा’ ‘आयसीएमआर’कडे उपलब्ध आहे. आतापर्यंत जे रुग्ण ‘डेल्टा प्लस’ने बाधित झाले त्यांच्याकडील माहितीवरून ‘डेल्टा’पेक्षा हा कमी संसर्गाचा असल्याचे पुढे आले आहे. यामुळे ‘डेल्टा प्लस’ला घाबरण्याचे कारण नाही. नवे ‘व्हेरियंट’ येतच राहणार आहे. यावर लसीकरणासोबतच ‘जिनोम सिक्वेसिंग’ करीत अभ्यास सुरू ठेवणे हाच उपाय आहे.

-डॉ. नितीन शिंदे, संसर्गजन्य आजारतज्ज्ञ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस