लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे नागपूरसह देशातील मोठी शहरे ‘लॉकडाऊन’ झाली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी काम बंद असून याचा फटका कष्टकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. अशा गरजूंच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समोर यावे व त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचावे, असे आवाहन सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले आहे.‘टिष्ट्वटर’च्या माध्यमातून त्यांनी सोमवारी सकाळी हे आवाहन केले. समाजात स्वच्छता, आरोग्य जागृतीबाबत स्वयंसेवकांनी लहान लहान गटांमध्ये संवाद साधावा, तसेच गरजूंपर्यंत भोजन पोहचविण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षेनुरूप सहकार्य करावे शिवाय शासनाच्या सर्व निर्णयांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन भय्याजी जोशी यांनी केले आहे.संघाच्या नियोजनाला सुरुवातयासंदर्भात विदर्भ प्रांतातील एका पदाधिकाऱ्याशी संपर्क केला असता गरजूंपर्यंत मदत पोहचविण्यासाठी स्वयंसेवकांचे नियोजन सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील गरजूंपर्यंत भागनिहाय मदत पोहचविली जाणार आहे. शासनाच्या नियमांचे पालन करत मोजकेच स्वयंसेवक प्रत्यक्ष जाऊन मदत पोहचवतील, असे त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून आरोग्याबाबत जागृतीदेखील नियमितपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रेल्वेस्थानकावर अडकलेल्यांना मदत
समाजातील गरजूंपर्यंत अन्न पोहचवा : सरकार्यवाहांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 20:18 IST
‘कोरोना’मुळे नागपूरसह देशातील मोठी शहरे ‘लॉकडाऊन’ झाली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी काम बंद असून याचा फटका कष्टकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. अशा गरजूंच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समोर यावे व त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचावे, असे आवाहन सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले आहे.
समाजातील गरजूंपर्यंत अन्न पोहचवा : सरकार्यवाहांचे आवाहन
ठळक मुद्दे‘कोरोना’विरोधातील लढ्यात संघाचा सेवाभाव