शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बेझनबाग सोसायटीमधील आरक्षित जमिनीवरील अवैध बांधकामे हटवा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 20:33 IST

बेझनबाग सोसायटीमधील आरक्षित जमिनीवरील अवैध बांधकामे आठ आठवड्यात हटविण्यात यावी व त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिलेत.

ठळक मुद्दे राज्य सरकारला आठ आठवड्याची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेझनबाग सोसायटीमधील आरक्षित जमिनीवरील अवैध बांधकामे आठ आठवड्यात हटविण्यात यावी व त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिलेत.या प्रकरणातील विविध मुद्यांवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी निर्णय जाहीर केला. राज्य सरकारने अवैध बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला असून, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागणीसह आरक्षित जमिनीवरील रहिवाशांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती याचिका खारीज केली. परंतु, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ मागितल्यामुळे, न्यायालयाने हा निर्णय चार आठवड्यासाठी स्थगित ठेवला. दरम्यान, अनधिकृत रहिवाशांना सर्वोच्च न्यायालयातून स्वत:च्या बाजूचा आदेश मिळविण्यात अपयश आल्यास, राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करावी लागेल. याशिवाय न्यायालयाने तत्कालीन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांना अवमानना कारवाईतून मुक्त केले. यापूर्वीच्या काही आदेशांचे पालन करण्यात अपयश आल्यामुळे यांच्याविरुद्ध ही कारवाई सुरू करण्यात आली होती. गत ९ जानेवारी रोजी न्यायालयाने या मुद्यांवर सुनावणी झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. अवैध बांधकामांविरुद्ध जनहित याचिका दाखल करणाऱ्या अधिकृतनागरिकांच्या वतीने अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.बेझनबाग संस्थेची बेकायदेशीर कृतीएम्प्रेस मिलचे कामगार व आश्रित सदस्यांना वाजवी दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी बेझनबाग प्रगतिशील गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. १९७७ साली राज्य सरकारने बेझनबाग येथे संस्थेला चार लाख रुपयांत ८०.०९ एकर जमीन दिली. संस्थेने त्या जमिनीवर ले-आऊट टाकले. कायदेशीर भूखंड विकल्या गेल्यानंतर संस्थेने ले-आऊटमधील आरक्षित जमिनीवरही भूखंड पाडून ते इच्छुकांना विकले. मोक्याची जागा असल्यामुळे अनेक अपात्र लोकांनी लागेबांधे लावून येथील भूखंड मिळविले. या जमिनीची विद्यमान किंमत कोट्यवधी रुपये आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे