शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नगरपालिकेच्या जागेवर काहींनी अतिक्रमण केले आहे. वारंवार मागणी करूनही ते हटविण्यात येत नाही. त्यामुळे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : नगरपालिकेच्या जागेवर काहींनी अतिक्रमण केले आहे. वारंवार मागणी करूनही ते हटविण्यात येत नाही. त्यामुळे तीन माजी नगरसेवक तुळशीराम काेठेकर, चंद्रशेखर भाेयर व रामानंद अडामे यांनी शहरातील महात्मा गांधी चाैकात गुरुवार(दि. १२)पासून आमरण उपाेषणाला सुरुवात केली आहे. पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे तसेच अतिक्रमणधारकांवर फाैजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राज्य शासनाच्या महसूल व वन मंत्रालयाच्या ३० जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार, देवस्थानच्या वहिवाटधारकांना देवस्थानच्या मालकीच्या जमिनीची विक्री करण्याचा अधिकार नाही. रामटेक शहरातील परमानंद स्वामी देवस्थानची सर्व्हे क्रमांक १६६/२ मध्ये स्थावर मालमत्ता आहे. काहींनी ही जमीन अकृषक (एनए) करून त्यावर भूखंड तयार केले व त्या भूखंडांची विक्रीही केली, अशी माहिती तुळशीराम काेठेकर यांनी दिली.

दुधाळा येथे ७२ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले असून, त्यांचे अद्यापही याेग्य पद्धतीने लाभार्थ्यांना वाटप केले नाही. त्यामुळे ती घरकुले अवैध धंद्यांचा अड्डा बनली आहेत. ही संपूर्ण अतिक्रमणे हटवून पालिका प्रशासनाने ती जागा ताब्यात घ्यावी तसेच घरकुलांचे वाटप करावे, यासाठी आमरण उपाेषणाला सुरुवात केल्याची माहिती तुळशीराम काेठेकर, चंद्रशेखर भाेयर व रामानंद अडामे यांनी संयुक्तरीत्या दिली. शहरातील बसस्थानक ते लंबे हनुमान मंदिरापर्यंत मूत्रीघराची व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

...

पालिकेच्या जागेवर ग्रामपंचायतद्वारे कर आकारणी

महसूल विभागाच्या दस्तऐवजानुसार सर्व्हे क्रमांक १४२, १४५, १५०, १५१, १५२, १९६, १६९ व २४४ मधील जमीन रामटेक नगर परिषदेच्या हद्दीत आहे. मात्र, त्या जागेवर नवरगाव-आमगाव ग्रामपंचायतने कर आकारणी केली आहे. ही बाब अवैध असल्याने पालिका प्रशासनाने ती जमीन ताब्यात घ्यावी व त्यावर कर आकारणी करावी, अशी मागणी या तिन्ही माजी नगरसेवकांनी केली आहे.

...

गाळे व शाैचालयाचे बांधकाम

सिटी सर्व्हे क्रमांक १३८, १४७, १५०, १४८ व १४६ मधील जमिनीची आराजी ८१४१.८ व १०८८८.५ चाैरस मीटर आहे. या जागेवर साेनेघाट ग्रामपंचायतने अतिक्रमण करून त्यावर कर आकारणी केली. कवडस वाॅर्ड व नवीन विनाेबा वाॅर्डमधील सर्व्हे क्रमांक २२० तसेच महा सरकार झुडपी जंगल सर्व्हे क्रमांक २२२, २२३ व २२४ या जागेवर गाळे व शाैचालयाचे बांधकाम करण्यात आल्याचे तुळशीराम काेठेकर यांनी सांगितले.

...

यासंदर्भात आंदाेलनकर्त्यांशी चर्चा केली आहे. संबंधित विभागाकडून माहिती घेणे सुरू आहे. यात कुणीही बेकायदेशीर कामे केली असल्यास त्यांच्यावर याेग्य कारवाई करून फाैजदारी गुन्हे दाखल केले जाईल. संबंधित जागेवरील अतिक्रमण हटवून त्याला तारांचे कुंपण घातले जाईल. प्रशासकीय कामांमध्ये थाेडा वेळ लागत असल्याने आंदाेलनकर्त्यांनी सहकार्य करावे. त्यांना न्याय नक्कीच मिळेल.

- हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी,

नगर परिषद, रामटेक.