शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

फ्रान्स आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाने केले ‘मेट्रो’चे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:52 IST

‘महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड’अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचा फ्रान्स व जर्मनीच्या शिष्टमंडळाने आढावा घेतला व एकूण कामावर समाधान व्यक्त करत कौतुक केले.

ठळक मुद्देवित्त पुरवठा संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश : व्यावसायिक स्टेशनची केली पाहणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड’अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचा फ्रान्सजर्मनीच्या शिष्टमंडळाने आढावा घेतला व एकूण कामावर समाधान व्यक्त करत कौतुक केले. ‘मेट्रो’च्या कार्याचा आढावा घेण्यासाठी के.एफ.डब्लू. जर्मनी आणि ए.एफ.डी फ्रान्स सरकारच्या अंतर्गत विकास बँकेतर्फे नेमण्यात आलेली समिती तीन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आली आहे. या समितीने ‘नागपूर मेट्रो’च्या प्रवासी मार्गाचे निरीक्षण करत व्यावसायिक स्टेशनची पाहणी केली व विविध प्रकल्पांची माहिती घेतली.नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या संयुक्त देखरेख मिशन अंतर्गत या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची अंमलबजावणी कशा पद्धतीने सुरू आहे, तसेच तांत्रिकी,वित्तीय आणि ‘इएसएचएस’ दृष्टिकोन तपासण्याच्या उद्देशाने या दौºयाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी या समितीतील प्रतिनिधींनी सिव्हील लाईन्स, स्थित मेट्रो हाऊस येथे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांची भेट घेतली व प्रकल्पासंदर्भात विस्तुत चर्चा केली. डॉ. दीक्षित यांनी प्रकल्पाच्या भौतिक आणि वित्तीय प्रगती तसेच मेट्रोद्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची माहिती शिष्टमंडळाला दिली. चर्चेदरम्यान जर्मनी आणि फ्रान्सच्या शिष्टमंडळाने महा मेट्रोद्वारे, राबविण्यात येत असलेल्या ‘मल्टी मॉडल इंटिग्रेशन’, ‘ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट’ (टीओडी), ‘कॉमन मोबिलीटी कार्ड’, ‘फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’,‘फीडर सर्व्हिस’ तसेच सोलर ऊर्जा प्रकल्पाचा आढावा घेतला व मेट्रोच्या संपूर्ण कार्यावर समाधान व्यक्त केले.या शिष्टमंडळात के.एफ.डब्ल्यू. जर्मनीचे प्रकल्प व्यवस्थापक क्रिस्टीयन वोस्लर, तांत्रिक तज्ञ पीटर रुनी, सेफगार्ड तज्ज्ञ जुटा वोल्मर, सेफगार्ड तज्ञ सविता मोहन राम,वरिष्ठ क्षेत्र तज्ञ स्वाती खन्ना तसेच ए.एफ.डी. फ्रान्सचे भारतातील व्यवस्थापक ब्रुनो बोसल, सेफगार्ड तज्ज्ञ सिल्वेन बर्नाड-श्रीनिवासन, प्रकल्प व्यवस्थापक रजनीश अहुजा यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. तसेच महा मेट्रोच्या वतीने संचालक(प्रकल्प) महेश कुमार,संचालक (रोलिंग स्टॉक) महेश सुनील माथुर, संचालक(वित्त) एस.शिवमाथन, संचालक (प्रकल्प नियोजन) रामनाथ सुब्रमण्यम, कार्यकारी संचालक(प्रशासन) अनिल कोकाटे यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोFranceफ्रान्सGermanyजर्मनी