शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमुळे हज यात्रेकरूंच्या विमानाला उशीर

By admin | Updated: September 18, 2015 02:55 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेकरूंना ९ सप्टेंबरला जेद्दाह ...

सौदी अरबमध्ये फ्लाईट कॉरिडोर बंद : एअर इंडियातर्फे वेळेचे पालननागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हज यात्रेकरूंना ९ सप्टेंबरला जेद्दाह येथे नेणारी दोन विमाने आणि १० सप्टेंबरला एका विमानाने निर्धारित वेळेपेक्षा उशिरा उड्डाण भरल्याची माहिती आहे. पहिल्या दिवशी ९ सप्टेंबरला दुपारी दुसऱ्या विमानाने धावपट्टीलगत इंधन वाहून नेणारे टँकर खराब झाल्याने एक तास उशिरा उड्डाण भरले. या टँकरद्वारे आयओसीच्या बाऊन्सर विमानात इंधन भरण्यात येत होते. याशिवाय ९ सप्टेंबरला हज यात्रेकरूंच्या पहिल्या विमानाने सौदी अरबमध्ये एक फ्लाईट कॉरिडोर अचानक बंद करण्यात आल्याने उशिरा उड्डाण भरले. यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (डीजीसीए) परवानगी घेण्यात आली. एअर इंडियातर्फे अधिकाऱ्यांची नियुक्तीप्राप्त माहितीनुसार, नागपूरहून जेद्दाहला जाणाऱ्या एकूण यात्रेकरूंमध्ये विमानाच्या प्रवासीसंख्येनुसार ३४० प्रवाशांचे पाच जत्थे तयार करण्यात आले होते. उर्वरित ११० प्रवाशांना ९ सप्टेंबरला दुपारी दुसरे विमान नेणार होते. हे विमान कोची येथून दुपारी १ वाजता नागपुरात आले आणि दुपारी १.३० वाजता जेद्दाहकडे उड्डाण भरणार होते. पण इंधन टँकर तांत्रिक कारणांमुळे वेळेत बाजूला न झाल्याने हे विमान एक तास उशिरा अर्थात २.३० वाजता आकाशात झेपावले. हज यात्रेकरूंना त्रास होऊ नये म्हणून एअर इंडियाने हज हाऊसमध्ये वरिष्ठ पर्यवेक्षक मुकेश यांच्यासह तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. हज समितीवर यात्रेकरू नाराजठरलेल्या मेन्यूनुसार नाश्ता आणि जेवण न मिळाल्यामुळे हज यात्रेकरूंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. सुटकेसची किंमत वसूल करणाऱ्या समितीने यात्रेकरूंना चहासुद्धा दिला नसल्याची तक्रार आहे. एअर इंडियाने आॅन बोर्ड सर्व्हिसमध्ये दिलेला मेन्यू सकाळच्या नाश्त्यात देण्याची यात्रेकरूंची मागणी होती. बहुतांशजण सकाळच्या नाश्त्यात मांसाहार टाळतात. कॅटरिंगचे ग्राऊंड सर्व्हिसचे कंत्राट एका स्थानिक व्यावसायिकाला दिल्याने उपरोक्त प्रकरण घडल्याची माहिती आहे. सेंट्रल तंजिम समितीचे उपाध्यक्ष शाहीद नसीम खान यांनी सांगितले की, हज समिती प्रत्येक यात्रेकरूंच्या व्यवस्थेसाठी २०० रुपये देते. यामध्ये निवास, इंटरनेट आणि विमानतळापर्यंत प्रवासाची सुविधांचा समावेश आहे. यात्रेकरूंना चहा देण्यासाठी हज समिती कोणतीही रक्कम उपलब्ध करून देत नाही. एअर इंडियातर्फे वेळेचे पालनहजयात्रेकरूंच्या विमानाकडे विशेष लक्ष देण्यात आले. पण दोन तांत्रिक तर एका यात्रेकरूच्या चुकीमुळे एकूण तीन विमानांच्या उड्डाणाला उशीर झाला. यासाठी एअर इंडिया जबाबदार नाही. हज समितीच्या सहकार्याने ठरलेल्या मेन्यूनुसार यात्रेकरूंना जेवण देण्यात आले. पासपोर्ट गहाळ झाल्याने उशीर१० सप्टेंबरला हज यात्रेकरूंच्या चुकीमुळे विमानाला उशीर झाला. एकाने दुसऱ्याच यात्रेकरूचा पासपोर्ट असलेली बॅग नेली होती. त्यामुळे एअर इंडियाच्या चमूला ३४० यात्रेकरूंकडे विचारणा करावी लागली होती; नंतरच्या दिवसांत तीन विमानांनी वेळेवर उड्डाण भरले.