शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण भिंत व अंतर्गत रोडचा वादात डॉ. हेडगेवार समिती म्हणते आम्हाला प्रतिवादी करा- हायकोर्टात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 22:43 IST

रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये महानगरपालिकेच्या सार्वजनिक निधीतून संरक्षण भिंत व अंतर्गत रोड बांधण्याविरुद्धच्या प्रकरणात स्वत:ला प्रतिवादी करून घेण्यासाठी डॉ. हेडगेवार स्मृती समितीने सचिव अभय अग्निहोत्री यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.

नागपूर : रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये महानगरपालिकेच्या सार्वजनिक निधीतून संरक्षण भिंत व अंतर्गत रोड बांधण्याविरुद्धच्या प्रकरणात स्वत:ला प्रतिवादी करून घेण्यासाठी डॉ. हेडगेवार स्मृती समितीने सचिव अभय अग्निहोत्री यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.यासंदर्भात न्यायालयात नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांची जनहित याचिका प्रलंबित आहे. डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मालकीचा नाही. हा परिसर समितीच्या मालकीचा आहे. याची याचिकाकर्त्याला माहिती आहे. असे असतानाही याचिकाकर्त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला याप्रकरणात जाणिवपूर्वक गुंतवले. ही याचिका वाईट हेतूने दाखल करण्यात आली आहे. डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसर मालक या नात्याने डॉ. हेडगेवार स्मृती समिती याप्रकरणात आवश्यक प्रतिवादी आहे, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच स्वत:ची भूमिका मांडता यावी यासाठी समितीला प्रकरणात प्रतिवादी करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. समिती संस्था नोंदणी कायदा-१८६० अंतर्गत नोंदणीकृत आहे, अशी माहितीही अर्जात देण्यात आली आहे.यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यात प्रकरणातील प्रतिवादींमधून संघाचे नाव वगळण्याची विनंती करण्यात आली आहे. डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसर संघाच्या मालकीचा नाही व डॉ. हेडगेवार स्मृती समितीशी संघाचा संबंध नाही असा दावा संघाच्या अर्जात करण्यात आला आहे. डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात मनपाच्या सार्वजनिक निधीतील १ कोटी ३७ लाख रुपये खर्चून संरक्षण भिंत व अंतर्गत रोडचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यावर मून यांचा आक्षेप आहे.