शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या डिफेन्स परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 14:44 IST

मित्राचा फोन आल्यानंतर घराबाहेर पडलेल्या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयुध निर्माणीच्या (डिफेन्स) परिसरातील आटा चक्कीजवळ रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देमित्राच्या फोन कॉलमुळे घराबाहेर पडताच झाला होता बेपत्तासकाळी आढळला मृतदेहमारेकरी अज्ञात

आॅनलाईन लोकमतवाडी : मित्राचा फोन आल्यानंतर घराबाहेर पडलेल्या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयुध निर्माणीच्या (डिफेन्स) परिसरातील आटा चक्कीजवळ रविवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.जितेंद्र हरिराम कालपांडे (३२, रा. सत्यसाई सोसायटी, वाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. जितेंद्र हा रविवारी सायंकाळी आयुध निर्माणी परिसरातील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेला होता. तो रात्री ८.३० वाजताच्या सुमारास भाजीपाला घेऊन घरी परतला. दरम्यान, रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्याला त्याच्या मित्राचा फोन आल्याने तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो रात्रभर घरी परत आला नाही, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.दरम्यान, सोमवारी सकाळी काही नागरिक या परिसरात फिरायला गेले असता, त्यांना आटा चक्कीजवळ मृतदेह पडला असल्याचे आढळून आले. माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर हा मृतदेह जितेंद्र कालपांडे याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा खून कुणी आणि कशासाठी केला, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी वाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Murderखून