शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

शहर विद्रूप करणाऱ्या २३,९७० जणांवर कारवाई : अडीच कोटींचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 9:07 PM

शहर विद्रूप करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने मागील तीन वर्षांत विद्रुपीकरण करणाऱ्या २३ हजार ९७० व्यक्तींवर कारवाई करून २ कोटी ५० लाखांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देमनपाच्या उपद्रव शोध पथकाची तीन वर्षातील कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नियमांचे उल्लंघन करून शहर विद्रूप करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महापालिकेने उपद्रव शोध पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने मागील तीन वर्षांत सार्वजनिक ठिकाणी घाण व विद्रुपीकरण करणाऱ्या २३ हजार ९७० व्यक्तींवर कारवाई करून २ कोटी ५० लाखांचा दंड वसूल केला आहे.नागरिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे, नियमांचे पालन करावे, लोकसहभागातून शहराचे सौंदर्य वाढवावे, यासाठी महापालिके तर्फे वेळोवेळी आवाहन केले जाते. सोबतच लोकांच्या वाईट सवयींवर निर्बंध घालण्यासाठी ११ डिसेंबर २०१७ रोजी महापालिकेच्या स्वच्छता विभागांतर्गत उपद्रव शोध पथकाची नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला यात ४१ माजी सैनिकांचा समावेश होता. आता ही संख्या ८७ झाली आहे. यात एक पथक प्रमुख, १० झोन स्क्वॉड लीडर आणि ७६ सुरक्षा सहायक आदींचा समावेश आहे. नियमांचे उल्लंघन अथवा सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना उपद्रव शोध पथकातर्फे नोटीस जारी केली जाते. संबंधितानी निर्धारित वेळेत कार्यवाही न केल्यास दोषीला दंड आकारला जातो. महापालिकेच्या निर्णयानुसार विविध २१ उपद्रवासाठी पथकाकडून दंड आकारण्यात येतो. सार्वजनिक रस्ता, फूटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी विनापरवानगी बांधकाम साहित्य साठविल्यास नोटीस बजावली जाते. ४८ तासात ते न हटविल्यास दंड आकारला जातो. अशा स्वरुपाचा १ कोटी १८ लाख ७८ हजार इतका दंड वसूल केला आहे. इतर उपद्रवापोटी २३ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांकडून ७८ हजार ५०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर लघवी करणाऱ्यांकडून १ लाख ९४ हजार ३००, हातगाड्या, स्टॉल्सवाल्यांकडून परिसरात घाण केल्याप्रकरणी ९ लाख ६३ हजार ९०० रुपये, रस्ता, फूटपाथ, मोकळ्या जागांवर कचरा टाकणाऱ्यांकडून ३९ हजार, दुकानदारांकडून ५ लाख ३२ हजार ६०० रुपये, रस्ता, मोकळ्या जागांवर कचरा टाकणाऱ्या शैक्षणिक संस्थांनाकडून ५ लाख ६० हजार, दवाखाने, इस्पितळांकडून १ लाख ९१ हजार, मॉल, उपहारगृहे, लॉजींग, बोर्डिंग हॉटेल्स, थिएटर, मंगल कार्यालये, कॅटरर्स यांच्याकडून ९ लाख ८८ हजार रुपये, विनापरवानगी शहरात जाहिरात फलक लावणाऱ्यांकडून ३६ हजार ५०० रुपये, रस्त्यावर मंडप टाकणाऱ्यांकडून ६ लाख ६५ हजार ३०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणाºयांकडून १ लाख ४१ हजार रुपये, कचरा मोकळ्या जागांवर टाकणाऱ्या चिकन, मटन सेंटरकडून १ लाख ३८ हजार ५०० रुपये, कचºयात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून १ लाख ६९ हजार, वर्कशॉप, गॅरेज व्यावसायिकांकडून ६ लाख ९१ हजार असा एकूण २ कोटी ६६ लाख २४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्लास्टिक जप्तीपोटी शासन नियमानुसार आकारलेल्या दंडाची रक्कम ४४ लाख एक हजार ५०० रुपये इतकी आहे.नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहननागपूर शहर संपूर्ण देशात सुंदर शहर म्हणून ख्यातिप्राप्त होत आहे. आपले शहर हिरवे, सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यात नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याकडून कुठलाही उपद्रव होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी, उपद्रव आढळल्यास त्वरित महापालिकेचे उपद्रव शोध पथक किंवा स्वच्छता विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार व आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका