शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

दीपक निलावार यांचा बंगला ‘सील’ : कोट्यवधींच्या कर्जाचे हप्ते थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:17 IST

कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची रक्कम थकीत असल्यामुळे शहरातील नामांकित बिल्डर दीपक निलावार यांच्या बंगल्याला बुधवारी ‘सील’ ठोकण्यात आले. वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी स्थित त्यांच्या बंगल्यावर नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत बँक अधिकाऱ्यांनी ‘सीलिंग’ची कारवाई पूर्ण केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईच्या वेळी निलावार कुटुंबीयदेखील उपस्थित होते, मात्र दीपक निलावार तेथून निघून गेले. बँकेच्या या कारवाईमुळे शहरातील बिल्डर्समध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनायब तहसीलदारांच्या उपस्थितीत बँकेची कारवाई

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची रक्कम थकीत असल्यामुळे शहरातील नामांकित बिल्डर दीपक निलावार यांच्या बंगल्याला बुधवारी ‘सील’ ठोकण्यात आले. वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी स्थित त्यांच्या बंगल्यावर नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत बँक अधिकाऱ्यांनी ‘सीलिंग’ची कारवाई पूर्ण केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईच्या वेळी निलावार कुटुंबीयदेखील उपस्थित होते, मात्र दीपक निलावार तेथून निघून गेले. बँकेच्या या कारवाईमुळे शहरातील बिल्डर्समध्ये खळबळ उडाली आहे. 

प्राप्त झालेल्या माहितीनुसार निलावार यांनी त्यांची कंपनी मे.रेवती कन्स्ट्रक्शन अ‍ॅन्ड डेव्हलपर्सच्या नावाने २०१७ मध्ये शिक्षक सहकारी बँकेतून २ कोटी ७८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांचे हे कर्ज ‘ओव्हरड्राफ्ट’ झाले. कर्ज घेतल्यापासूनच त्यांनी अनियमितपणे हप्ते भरले. ही रक्कम वाढून ५ कोटी ५० लाख इतकी झाली. कर्ज न फेडल्यामुळे बँकेकडून वारंवार सूचनादेखील देण्यात आली. ‘सिक्युरीटायझेशन अ‍ॅक्ट २००२’अंतर्गत त्यांना नोटीसदेखील बजाविण्यात आली. ६० दिवसांची मुदत संपल्यानंतर बँकेने अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सुनावणीनंतर त्यांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना जप्तीचे आदेश दिले. बुधवारी जवळपास २ वाजताच्या सुमारास नायब तहसीलदार आभा वाघमारे आणि बँकेचे अधिकृत अधिकारी श्रीकांत तोडे, उपमहाव्यवस्थापक विवेक बापट, सीताबर्डी शाखेचे व्यवस्थापक मनोज चक्रधरे, माजी व्यवस्थापक प्रभाकर फुटे व इतर अधिकारी प्लॉट क्रमांक २६१, २६२ व २६३ येथे बनलेल्या पिरॅमिड टॉवर येथे पोहोचले. सुमारे तीन तास कारवाई चालली व निलावार यांच्या बंगल्याला ‘सील’ ठोकण्यात आले.बँकेने तैनात केला ‘गार्ड’कारवाई पूर्ण होईपर्यंत कुणालाही आत येण्याची परवानगी देण्यात आली नाही. कारवाई पूर्ण झाल्यानंतर बंगल्याच्या बाहेरील दारावरदेखील कुलूप लावण्यात आले. बँकेकडून निगराणीसाठी ‘गार्ड’देखील तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :bankबँकnagpurनागपूर