शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रुग्णांप्रति आनंदाचे ‘समर्पण’; दिवाळीनिमित्त दिली कपड्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 10:49 IST

दिवाळीच्या दिवसात रुग्णांना नव्या कोऱ्या कपड्यांची भेट देत त्यांच्या आनंदात अनोखी दिवाळी साजरी करीत आहे.

ठळक मुद्देसमर्पण संस्थेचा अभिनव उपक्रम

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुखणे सोसात असताना नाउमेद होत असलेले मन, तोच तो औषधांचा दर्प, उपचार करण्याची परिस्थिती नसताना संघर्ष करीत असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक. दिवाळीच्या झगमगटापासून दूर असलेल्या या रुग्णांचा चेहऱ्यावरही या सणाचा आनंद दिसावा, यासाठी समर्पण संस्था गेल्या १५ वर्षांपासून विधायक कार्य करीत आहे. दिवाळीच्या दिवसात रुग्णांना नव्या कोऱ्या कपड्यांची भेट देत त्यांच्या आनंदात अनोखी दिवाळी साजरी करीत आहे.अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देणाऱ्या या सणाची खासियत काही औरच. दारासमोरची रांगोळी, आकाशकंदील, फराळ आणि फटाक्यांसह दिवाळीच्या चार दिवसांमध्ये सर्वत्र उत्साह संचारला असतो, मात्र शासकीय रुग्णालयातील चित्र वेगळेच असते. दिवाळीचा प्रारंभ म्हणजे धनत्रोयदशीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सुमारे ८०० वर रुग्णांना नव्या कपड्यांची भेट दिली जाते.ही परंपरा गेल्या आठ वर्षांपासून जपली जात आहे. सोमवारी साड्या, पातळ, शर्ट, धोतर, लहान मुलांचे ड्रेस अशा कपड्यांची अनोखी भेट स्वीकारताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. ‘समर्पण’ आणि रुग्णांमध्ये एक हळूवार भावनिक नाते जुळले होते.हनुमानप्रसाद राठी, ओमप्रकाश खंडेलवाल, अनिल किनाडीवाला, वाळकेजी यांच्यासह आणखी काहीजण ‘समर्पण’मध्ये आहेत. यातील प्रत्येक जण आपल्या व्यवसायत मिळालेल्या नफ्यातील काही भाग या स्तुत्य उपक्रमावर खर्च करतात. सोमवारी या कपड्यांचे वाटप करताना स्वत: मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे, नगरसेविका काडगाये, डॉ. बागडे यांच्यासह मेडिकलचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

रुग्णांना रोज दिला जातो फलाहार‘समर्पण’चा दिवस मेडिकलमध्ये सकाळी ७ वाजतापासून सुरू होतो. तब्बल ४० वॉर्डातील रुग्णांना फळांची न्याहरी देतात. ही सेवा देत असताना बाहेरगावातील रुग्णांच्या नातेवाईकांना दुपारच्या जेवणाच्या कूपन्सही वितरित करतात. रोज साधारण ३५० जणांची भूक भागवितात. राजाबाक्षातील ‘समर्पण’ वास्तूत वर्षाचे ३६५ दिवस हे अन्नछत्र सुरू असते.

टॅग्स :Diwaliदिवाळी