शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जोखमीच्या मातांवरील उपचाराने मृत्यू दरात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:56 IST

अ‍ॅनिमिया, वाढलेला रक्तदाब, अतिरक्तस्त्राव, पोटातील बाळाची अव्यवस्थित वाढ, कमी झालेली प्लेटलेटची संख्या व गर्भावस्थेतील मधुमेह ही अति जोखमी मातांची लक्षणे आहेत. ही लक्षणे ओळखून तातडीने उपचार होत असल्याने माता मृत्यूची संख्या कमी झाली आहे. सध्या अ‍ॅनिमिया, उच्च रक्तदाब व गर्भावस्थेतील मधुमेह हे जोखमीच्या मातांमध्ये मुख्य कारण दिसून येत आहे, अशी माहिती नागपूर आॅब्स्टेस्ट्रीक अ‍ॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीच्या (एनओजीएस) अध्यक्षा डॉ. कांचन सोरटे यांनी दिली.

ठळक मुद्देकांचन सोरटे : ‘फॉग्सी जेस्टोसिस’ परिषद २७पासून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅनिमिया, वाढलेला रक्तदाब, अतिरक्तस्त्राव, पोटातील बाळाची अव्यवस्थित वाढ, कमी झालेली प्लेटलेटची संख्या व गर्भावस्थेतील मधुमेह ही अति जोखमी मातांची लक्षणे आहेत. ही लक्षणे ओळखून तातडीने उपचार होत असल्याने माता मृत्यूची संख्या कमी झाली आहे. सध्या अ‍ॅनिमिया, उच्च रक्तदाब व गर्भावस्थेतील मधुमेह हे जोखमीच्या मातांमध्ये मुख्य कारण दिसून येत आहे, अशी माहिती नागपूर आॅब्स्टेस्ट्रीक अ‍ॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीच्या (एनओजीएस) अध्यक्षा डॉ. कांचन सोरटे यांनी दिली.नागपूर आॅब्स्टेस्ट्रीक अ‍ॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीच्या (एनओजीएस) वतीने २७ ते २९ जुलैपर्यंत ‘फॉग्सी जेस्टोसिस-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी ‘फॉग्सी’च्या सचिव डॉ. सुषमा देशमुख, डॉ. चैतन्य शेंबेकर, डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, डॉ. अल्का मुखर्जी, डॉ. वैदेही मराठे आदी उपस्थित होत्या.डॉ. देशमुख म्हणाल्या,महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत ६१ मातामृत्यू होतात. तर केरळमध्ये एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत ४६ मातामृत्यू होतात. मातामृत्यू रोखण्यासाठी प्रसूती व स्त्रीरोग संघटनेने पुढाकार घेतला आहे. त्याचे एक पाऊल म्हणजे ‘फॉग्सी जेस्टोसिस’ परिषदचे आयोजन. यात देशी व विदेशी तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. डॉ. पॅट्रीक ओब्रायन व डॉ. संजय गुप्ते हे व्याख्यानमालेत बोलणार आहेत.धोकादायक प्रसूतीवर जनजागृतीडॉ. अल्का मुखर्जी म्हणाल्या, धोकादायक प्रसूतीवर २६ जुलै रोजी मातृसेवा संघ येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार उपस्थित राहतील. यावेळी मोफत रक्तलोह चाचणी, आहाराचा सल्ला यावरही मार्गदर्शन केले जाईल.आॅब्स्टेस्ट्रीक आयसीयूची भूमिका महत्त्वाचीडॉ. चैतन्य शेंबेकर म्हणाले, मातामृत्यू रोखण्यासाठी ‘आॅब्स्टेस्ट्रीक आयसीयू’ची भूमिका महत्त्वाची ठरते. परंतु मोजके मोठे खासगी रुग्णालये सोडल्यास अनेक रुग्णालयात या ‘आयसीयू’ची सोय नाही. काही रुग्णालयांमध्ये ‘हाय डीपेंडेन्सी युनिट’ (एचडीयु) आहे. याचीही बरीच मदत होते.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर