शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

डिझेलच्या वापरात घट - ध्वनी प्रदूषणही झाले कमी

By admin | Updated: September 11, 2014 01:08 IST

मध्य रेल्वेचा नागपूर विभाग विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण करून रजत जयंती वर्ष साजरे करीत आहे. यामुळे विभागातील डिझेलचा वापर कमी होऊन ध्वनी प्रदूषण आणि कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे.

विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण : नागपूर विभाग साजरे करतेय रजत जयंती वर्षनागपूर : मध्य रेल्वेचा नागपूर विभाग विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण करून रजत जयंती वर्ष साजरे करीत आहे. यामुळे विभागातील डिझेलचा वापर कमी होऊन ध्वनी प्रदूषण आणि कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे.विभागात १९८३ मध्ये विद्युतीकरणाला सुरुवात झाली. विभागात पहाडी भागात हेलिकॉप्टरच्या साह्याने विद्युत खांब बसविण्यात आले. विद्युतीकरणाचे कठीण काम पूर्ण करताना विभागात नागपूर-वर्धा-बल्लारशा भागात ११ सप्टेंबर १९८९ ला रेल्वेगाडी क्रमांक २६१५ जीटी एक्स्प्रेस ही पहिली विद्युतीकरण झालेली गाडी धावली. सप्टेंबर १९८९ मध्ये नागपूर-वर्धा-बल्लारशा या ४४० किलोमीटरच्या खंडात विद्युत ट्रॅक्शन सुरू झाल्यानंतर वर्धा-बडनेरा २३१ किलोमीटरच्या खंडात १९९१ मध्ये नागपूर ते इटारसी ही ५७३ किलोमीटरच्या खंडात विद्युत ट्रॅक्शन १९९१ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर या खंडाचे दुहेरीकरण, ब्रॉंच लाईन, साईडिंगमध्ये विद्युतीकरण झाले. सप्टेंबर २०१४ पर्यंत १७४१ रेल्वे किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण होऊन तेथे विद्युत इंजिन धावत आहेत. विद्युतीकरणाच्या कामासाठी १४ ट्रॅक्शन सब स्टेशन कार्यरत आहेत. विद्युतीकरणाचे नेटवर्क नागपुरातील सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा अ‍ॅक्विझिशन तंत्रज्ञानाने करण्यात येते. विद्युत इंजिनच्या देखभालीसाठी २२ सप्टेंबर १९९० रोजी अजनीत विद्युत लोकोशेडची स्थापना करण्यात आली. या विद्युत लोकोशेडमधून पहिले इंजिन २२ आॅक्टोबर १९९० ला सुरू झाले. अजनी विद्युत लोकोशेडमध्ये १९८९ मध्ये ५ विद्युत लोको होते. आता ही संख्या २०१४ मध्ये २०० झाली आहे. अजनीच्या विद्युत लोकोशेडमध्ये डब्लुएजी ५ (३८५०), डब्लुएजी ७ (५००० एचपी), डब्लुएएम ४ (३६४० एचपी), डब्लुएपी १ (३७६०), डब्लुएपी ४ (५००० एचपी), एसी/डीसी डब्लुएसीएम ३ (५०००/४७०० एचपी) या इंजिनचा समावेश आहे. यासोबतच ३ फेज विद्युत इंजिनमध्ये डब्लुएपी ५ (५४४० एचपी), डब्लुएपी ७ (६३५० एचपी), डब्लुएजी ९ (६००० एचपी) या विद्युत इंजिनची देखभालही करण्यात येते. विभागात विद्युतीकरणानंतर रेल्वेची वजन क्षमता १७ ते २४ डब्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. याशिवाय रेल्वेगाड्यांचा वेग वाढवून वेळेची बचतही होत आहे. विद्युतीकरणामुळे मालगाड्यांची क्षमताही २३०० टन ते ५३०० टनपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे ५१ टक्के डिझेलची बचत झाली असून विभागाला डिझेलच्या तुलनेत अतिशय कमी म्हणजे ४२० कोटींचे वीज बिल भरावे लागले आहे. (प्रतिनिधी)