शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर्षात मुलींच्या जन्म टक्केवारीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

योगेश पांडे नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर परत एकदा घटला आहे. २०१९ साली मुलांच्या तुलनेत ...

योगेश पांडे

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर परत एकदा घटला आहे. २०१९ साली मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माची टक्केवारी नऊ वर्षांत प्रथमच ९५ टक्क्यांच्या वर गेली होती. मात्र कोरोनाच्या वर्षात यात परत घट झाली आहे. २०२० मध्ये मुलींच्या जन्माची टक्केवारी ९४ टक्क्यांच्या खाली आली. २०११ पासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता एकूण जन्माचे प्रमाणदेखील कमी झाल्याचे दिसून येत आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात नागपूर महानगरपालिकेकडे जन्म, मृत्यूसंदर्भात विचारणा केली होती. १ जानेवारी २०२० ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत नागपुरात किती मुला-मुलींचा जन्म झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहिती व २०११ सालापासूनच्या आकडेवारीवर नजर टाकली असता ही बाब लक्षात आली आहे. २०२० सालात २३ हजार २२८ मुलांचा जन्म झाला व मुलींच्या जन्माचा आकडा २१ हजार ७५० इतका होता. मुलींच्या जन्माची टक्केवारी ही ९३.६४ टक्के इतकी होती. २०१९ साली हीच टक्केवारी ९५.२९ टक्के इतकी होती. २०११ साली शहरात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माची टक्केवारी ९३.२६ टक्के इतकी होती. २०१५ साली ही टक्केवारी ९४.२२ तर २०१८ साली ९४.२४ टक्के इतक्यावर पोहोचली. २०१६ सालानंतर प्रथमच मुलींच्या जन्माची टक्केवारी ९३.६५ टक्क्यांच्या खाली गेली.

दरम्यान, २०२१ वर्षातील सुरुवातीच्या चार महिन्यांत शहरात ८ हजार ८७९ बालकांचा जन्म झाला. त्यात ४ हजार ५५९ मुले व ४ हजार ३२० मुलींचा समावेश होता. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माची टक्केवारी ९४.७६ टक्क्यांवर आली होती.

१६ महिन्यात अविकसित मुलांचा जन्म

१ जानेवारी २०२० ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत ४०९ अविकसित बालकांचा जन्म झाला. यात २३६ मुले व १७३ मुलींचा समावेश होता.

१० वर्षांतील सर्वात कमी जन्म

२०२० मध्ये ४४ हजार ९७८ जन्मांची नोंद झाली. २०११ सालापासूनचे आकडे लक्षात घेतले तर २०२० मध्ये नागपुरात सर्वात कमी जन्म नोंदविल्या गेले. २०१४ साली सर्वाधिक ५८ हजार १८० जन्म झाले होते. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जन्माचा टक्का १६.५७ टक्क्यांनी घटला आहे.

मुला-मुलींच्या जन्माची आकडेवारी

वर्ष-जन्म (मुले)-जन्म (मुली)-मुलींची टक्केवारी- एकूण जन्म

२०११ - २८०८२ - २६१९२ - ९३.२६- ५४२७४

२०१२ - २८६५९ - २६७५६ - ९३.३५- ५५४१५

२०१३ - २९४९६ - २७६८७ - ९३.८६ - ५७१८३

२०१४ - ३००६२ - २८११८ - ९३.५३ - ५८१८०

२०१५ - २८३९९ - २६७५८ - ९४.२२ - ५५१५७

२०१६ - २८०२० - २६२४२ - ९३.६५ - ५४२६२

२०१७ - २८९२४ - २७१५५ - ९३.८८ - ५६०७९

२०१८ - २८६७४ - २७०२३ - ९४.२४ - ५५६९७

२०१९ - २७६०६ - २६३०६ - ९५.२९ - ५३९१२

२०२० - २३२२८ - २१७५० - ९३.६४ - ४४९७८

२०२१ (एप्रिलपर्यंत)- ४५५९ - ४३२० - ९४.७६ - ८८७९