शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 22:09 IST

Decision of medical course exam offline remains पदवी, पदव्युत्तर व प्रमाणपत्र वैद्यकीय अभ्यासक्रमांची २०२० मधील हिवाळी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शनिवारी कायम ठेवला.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा आदेश : विद्यार्थ्यांना निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट सादर करणे अनिवार्य

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पदवी, पदव्युत्तर व प्रमाणपत्र वैद्यकीय अभ्यासक्रमांची २०२० मधील हिवाळी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शनिवारी कायम ठेवला. त्यामुळे ही परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच होईल. परंतु, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी यासंदर्भात आदेश दिला. ऑफलाईन परीक्षेविरुद्ध हर्ड फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल देशमुख व फिजिओथेरपी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी नीतेश तानतरपले यांनी जनहित याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने १९ मे २०२१ रोजी या निर्णयाची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, १० ते ३० जूनपर्यंत ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील सुमारे ४५ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊन ही परीक्षा देणार आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. याचा विचार न करता वादग्रस्त निर्णय जारी करण्यात आला असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. त्यांनी ही परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता परीक्षा पद्धतीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. राहुल भांगडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थीexamपरीक्षा