शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नवीन ‘आरएसएस’ला नोंदणी नाकारण्याचा निर्णय योग्यच :हायकोर्टाने स्पष्ट केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 19:36 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या नावाच्या संस्थेची नोंदणी केली जाऊ शकत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले व या संस्थेला नोंदणी नाकारण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती अमान्य केली.

ठळक मुद्देनिर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती अमान्य

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या नावाच्या संस्थेची नोंदणी केली जाऊ शकत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले व या संस्थेला नोंदणी नाकारण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती अमान्य केली.सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी यासंदर्भात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आला. अर्जावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या नावाच्या संस्थेला नोंदणी नाकारताना आम्ही सर्व कायदेशीर तरतुदींचा बारकाईने विचार केला होता. त्यामुळे त्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आम्हाला काहीच गरज वाटत नाही असे न्यायालयाने सांगितले.मून यांनी या संस्थेला नोंदणी मिळण्यासाठी सुरुवातीला सहायक संस्था निबंधकांकडे अर्ज दाखल केला होता. सहायक संस्था निबंधकांनी ४ ऑक्टोबर २०१७ रोजी तो अर्ज नामंजूर केला. त्या निर्णयाविरुद्ध मून यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गत २१ जानेवारी रोजी उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून सहायक संस्था निबंधकांचा निर्णय कायम ठेवला. त्यावर मून यांचा आक्षेप होता. उच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात २२ डिसेंबर २००५ रोजीच्या शासन परिपत्रकाच्या वैधतेवर भाष्य केले नाही आणि सहायक संस्था निबंधकांनी त्यांच्या निर्णयात ‘अवांच्छित नाव’ म्हणजे काय यावर स्पष्ट मत व्यक्त केले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करून हे प्रकरण सहायक संस्था निबंधकांकडे योग्य निर्णयासाठी परत पाठवावे असे मून यांचे म्हणणे होते. परंतु, त्यांचे मुद्दे न्यायालयाचे समाधान करू शकले नाहीत. मून यांच्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले तर, सरकारतर्फे अ‍ॅड. ए. एम. देशपांडे यांनी कामकाज पाहिले.यामुळे नाकारली नोंदणी२२ डिसेंबर २००५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार नावामध्ये ‘राष्ट्रीय’ शब्दाचा समावेश असलेल्या संस्थेला नोंदणी देता येत नाही. तसेच, नावावरून एखादी खासगी संस्था सरकारी आहे असे वाटत असल्यास संस्था नोंदणी कायदा-१८६० मधील कलम ३-ए अनुसार अशा संस्थेलाही नोंदणी देता येत नाही. सहायक संस्था निबंधकांनी या आधारावर मून यांचा नोंदणी अर्ज नामंजूर केला होता. तसेच, हा निर्णय कायम ठेवताना उच्च न्यायालयानेही या तरतुदी लक्षात घेतल्या होत्या.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ