शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटाचा निर्णय एकतर्फी देणे अवैध

By admin | Updated: October 17, 2016 02:49 IST

घटस्फोटाचा निर्णय एकतर्फी देता येऊ शकत नाही असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणातील आदेशात नोंदविले आहे.

हायकोर्टाचे निरीक्षण : कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्दनागपूर : घटस्फोटाचा निर्णय एकतर्फी देता येऊ शकत नाही असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणातील आदेशात नोंदविले आहे. या आदेशाद्वारे कुटुंब न्यायालयाचा वादग्रस्त एकतर्फी निर्णय रद्द करण्यात आला आहे.कुलदीप व जया असे प्रकरणातील पती-पत्नीचे नाव असून ते नागपूर येथील रहिवासी आहेत. २७ जून २०१२ रोजी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. यानंतर काही महिन्यांतच त्यांचे खटके उडायला लागले. दोघांचे आपसात पटत नव्हते. यामुळे कुलदीपने जयाच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ९ जानेवारी २०१५ रोजी कुटुंब न्यायालयाने ही याचिका मंजूर केली. या निर्णयाविरुद्ध जयाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपूर्ण पत्त्यामुळे जयाला कुटुंब न्यायालयाची नोटीस मिळाली नाही. असे असताना कुटुंब न्यायालयाने जयाला नोटीस मिळाल्याचे गृहित धरून कुलदीपच्या याचिकेवर एकतर्फी कार्यवाही केली ही बाब उच्च न्यायालयासमक्ष स्पष्ट करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व इंदिरा जैन यांनी संबंधित बाबी पडताळल्यानंतर वरीलप्रमाणे आदेश दिला. अन्य आदेशानुसार, हे प्रकरण नव्याने निर्णय घेण्यासाठी कुटुंब न्यायालयाकडे परत पाठविण्यात आले आहे. प्रकरणावर दहा महिन्यांमध्ये निर्णय देण्याचे निर्देश कुटुंब न्यायालयाला देण्यात आले आहे. तसेच, दोन्ही पक्षकारांनी येत्या २५ आॅक्टोबर रोजी कुटुंब न्यायालयात हजर व्हावे असे सांगण्यात आले आहे. जयातर्फे अ‍ॅड. ए. के. मदने तर, कुलदीपतर्फे अ‍ॅड. पी. के. सत्यनाथन यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)