शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचे भूसंपादन रद्द करण्याचा निर्णय कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:55 IST

गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील ५१० एकर जमिनीचे संपादन रद्दबातल ठरविण्याचा गेल्या २७ जुलैचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला दणका

आॅनलाईन लोकमतनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील ५१० एकर जमिनीचे संपादन रद्दबातल ठरविण्याचा गेल्या २७ जुलैचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला आहे. परिणामी, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला जोरदार दणका बसला आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी महामंडळ आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यास महामंडळाला नव्याने भूसंपादन प्रक्रिया राबवून शेतमालकांना २०१३ मधील नवीन कायद्यानुसार मोबदला द्यावा लागेल.सदर जमीन अड्याळ गावातील (ता. पवनी) असून ती प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येते. या भूसंपादनासाठी भूसंपादन कायद्याच्या कलम ४ अंतर्गत १६ जून २०११ रोजी पहिली तर, कलम ६ अंतर्गत ८ आॅगस्ट २०१२ रोजी अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर ३० आॅक्टोबर २०१४ रोजी ४० कोटीवर रुपयांच्या मोबदल्याचा निवाडा जारी करण्यात आला होता. त्याविरुद्ध २०१५ मध्ये महेश शृंगारपवार व इतर २४ शेतकºयांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. कायद्याच्या कलम ११-ए प्रमाणे मोबदल्याचा निवाडा ८ आॅगस्ट २०१२ पासून दोन वर्षांत म्हणजे ८ आॅगस्ट २०१४ किंवा त्यापूर्वी जारी करणे आवश्यक होते. परंतु, भूसंपादन अधिकाऱ्यांनी विलंबाने निवाडा जारी करून कलम ११-ए मधील तरतुदीचे उल्लंघन केले. परिणामी, भूसंपादन रद्दबादल ठरविण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.गेल्या २७ जुलै रोजी उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची याचिका मंजूर करून वादग्रस्त भूसंपादन प्रक्रिया रद्दबादल ठरवली. तसेच, कलम ११-ए मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे भंडारा जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी व इतर संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार करवाई करण्याचे निर्देश शासनाला दिलेत. एवढेच नाही तर, याप्रकरणात विविध प्रकारची अनियमितता व अवैधता झाल्याचे निरीक्षणही नोंदविले. या निर्णयावर पुनर्विचार व्हावा यासाठी पाटबंधारे महामंडळाने अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व अरुण उपाध्ये यांनी विविध बाबी लक्षात घेता खारीज केला आहे. त्यामुळे महामंडळापुढे आता सर्वोच्च न्यायालयाचा एकमेव पर्याय उपलब्ध राहिला आहे. महामंडळातर्फे अ‍ॅड. व्ही. जी. पळशीकर यांनी बाजू मांडली. मुख्य प्रकरणात शेतकऱ्यांतर्फे अ‍ॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले होते.

 

 

टॅग्स :Damधरण