शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक गडमंदिराला द्यावयाच्या ७५ लाखावर निर्णय घ्या : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 20:45 IST

रामटेक येथील गडमंदिराच्या गडाला बळकटी देण्याकरिता ७५ लाख रुपयाची गरज असून त्याकरिता सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर चार आठवड्यात निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देसरकारला चार आठवड्याचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक येथील गडमंदिराच्या गडाला बळकटी देण्याकरिता ७५ लाख रुपयाची गरज असून त्याकरिता सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर चार आठवड्यात निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला. तसेच, गडमंदिर व इतर बांधकामांच्या संवर्धनासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.गडमंदिराच्या संवर्धनाची गरज लक्षात घेता न्यायालयाने २०१० मध्ये स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गडमंदिरात रोज शेकडो भाविक दर्शनाकरिता जातात. परंतु, मंदिरात आजही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे येथील पुरातन बांधकामांचे नुकसान होत आहे. मंदिर परिसरात अनेकांनी अवैध बांधकामे व अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. मंदिराचा काही भाग अगस्त मुनी आश्रमच्या ताब्यात आहे. त्याची वैधता तपासणे आवश्यक आहे. मंदिर परिसरात दुकानदारांनी अतिक्रमण केले असून त्यांच्याकडून मंदिराला काहीच आर्थिक उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे दुकानदारांना अटी व नियमांसह नियमित करणे गरजेचे आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी वराह, शिरपूर, भैरव व गोकुल ही चार प्रवेशद्वारे ओलांडावी लागतात. या प्रवेशद्वारांची अवस्था चांगली नाही. प्रवेशद्वारांना जागोजागी भेगा गेल्या आहेत. गडाच्या पायथ्याशी रुद्र नरसिंह व केवल नरसिंहा यांची १५०० वर्षे जुनी मंदिरे आहेत. त्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. परंतु, दोन्ही मंदिराच्या देखभालीकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मंदिरे खराब होत आहेत. मंदिरातील देणगीचा वाद अद्याप निकाली निघालेला नाही. तसेच, भाविकांच्या सुविधेकरिता मंदिराजवळ स्वच्छतागृह बांधणे गरजेचे आहे. न्यायालय मित्र अ‍ॅड. आनंद जयस्वाल यांनी याचिकेचे तर, अ‍ॅड. महेश धात्रक यांनी रामटेक नगर परिषदेतर्फे कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRam Mandirराम मंदिर