शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

कोरोना निदानासाठी रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी टेस्ट करण्यावर निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 21:13 IST

कोरोनाचे तातडीने निदान होण्यासाठी देशातील सर्व राज्यांमध्ये रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्ट अनिवार्यपणे सुरू करण्यावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.

ठळक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाचा आदेशयाचिकेतील मुद्दे विचारात घेण्यास सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे तातडीने निदान होण्यासाठी देशातील सर्व राज्यांमध्ये रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्ट अनिवार्यपणे सुरू करण्यावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.यासंदर्भात नागपूर येथील चेस्ट फिजिशियन डॉ. राजेश स्वर्णकार यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. एन. व्ही. रामना, न्या. संजय कौल व न्या. भूषण गवई यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने हा आदेश देऊन याचिका निकाली काढली. केंद्र सरकारने संबंधित निर्णय घेण्यापूर्वी याचिकेतील मुद्यांवर गांभिर्याने विचार करावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले.इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चद्वारे कोरोना नियंत्रणाकरिता ४ एप्रिल रोजी जारी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्टचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांशी सखोल चर्चा केल्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. सध्या पीसीआर टेस्टद्वारे कोरोनाचे निदान केले जात आहे. ही प्रक्रिया खूप किचकट आहे. केवळ तज्ज्ञ व्यक्ती ही टेस्ट करू शकतात. ही टेस्ट करताना सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. या टेस्टची सुविधा देशात मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहे. या टेस्टच्या तुलनेत रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्ट सोपी आहे. ही टेस्ट करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती, महागडी उपकरणे, पीपीई किट इत्यादींची गरज नाही. ही टेस्ट कमी वेळेत व खर्चात करता येते. कोरोनासारखी लक्षणे असलेले अन्य विविध आजार आहेत. केवळ आवश्यक टेस्ट करूनच त्या आजारांचे निदान करता येते. त्यामुळे कोरोना निदानासाठी पीसीआर टेस्ट केंद्रांवरील ताण वाढला आहे. परिणामी, खासगी प्रयोगशाळांना कोरोना निदानाची परवानगी दिली जात आहे. कोरोना निदान अधिक प्रभावीपणे व तातडीने होण्यासाठी सरकारने रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्टचीही अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कौन्सिलने रॅपिड अ‍ॅन्टी बॉडी ब्लड टेस्टकरिता आठ किट्सना मान्यता दिली आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर व अ‍ॅड. ऋषी जैन यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :Courtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस