शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील जागा वाढविण्यावर निर्णय घ्या : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:12 IST

खासगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील एम. बी. बी. एस. अभ्यासक्रम प्रवेशात १० टक्के आरक्षण मागणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांकरिता मंगळवारी समाधानकारक घडामोड घडली. या आरक्षणाकरिता जागा वाढवून मिळण्यासाठी राज्य सरकारद्वारे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर दोन आठवड्यात निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बोर्ड ऑफ गव्हर्नर्सला (एमसीआय) दिला.

ठळक मुद्देआर्थिक दुर्बलांना आरक्षण देण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : खासगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील एम. बी. बी. एस. अभ्यासक्रम प्रवेशात १० टक्के आरक्षण मागणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांकरिता मंगळवारी समाधानकारक घडामोड घडली. या आरक्षणाकरिता जागा वाढवून मिळण्यासाठी राज्य सरकारद्वारे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर दोन आठवड्यात निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बोर्ड ऑफ गव्हर्नर्सला (एमसीआय) दिला. त्यामुळे या आरक्षणाचा लवकरच निकाल लागणार आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या आरक्षणाकरिता अमरावती येथील यश भुतडा या विद्यार्थ्याने रिट याचिका दाखल केली आहे. राज्य सीईटी सेलने पदव्युत्तर वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमातील प्रवेशात आर्थिक दुर्बल घटकासाठी १० टक्के आरक्षण लागू केले होते. परंतु, ४ जून २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केले व प्रवेशक्षमता वाढविल्यास आरक्षण दिले जाऊ शकते, असे सांगितले होते. त्यानंतर २१ जून २०१९ रोजी केंद्र सरकारने सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमाला ९७० जागा वाढवून दिल्या. त्यामुळे या महाविद्यालयांत आर्थिक दुर्बलांना आरक्षण देता आले. खासगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशक्षमता मात्र वाढवून देण्यात आली नाही. त्यामुळे या महाविद्यालयात आर्थिक दुर्बलांना आरक्षण देण्यात आले नाही. राज्य सरकारने या महाविद्यालयात प्रवेशक्षमता वाढवून मिळण्यासाठी गेल्या ११ जून रोजी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सला प्रस्ताव सादर केला आहे. परंतु, त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. करिता, बोर्ड ऑफ गव्हर्नर्सला आवश्यक निर्देश देण्याची विनंती सरकारने न्यायालयाला केली होती. त्यानुसार न्यायालयाने हा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMedicalवैद्यकीय