शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी विशेष जेईई-नीट परीक्षा आयोजित करण्यावर निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 10:39 IST

विदर्भामधील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शिक्कामोर्तब झाले.

ठळक मुद्देहायकोर्टाचे एनटीएला निर्देशसध्या ही परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भामधील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे ही परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार पार पडेल. परंतु, पूर प्रभावित विद्यार्थ्यांचे त्यांची काहीही चूक नसताना नुकसान होऊ नये याकरिता त्यांच्यासाठी विशेष जेईई-नीट परीक्षा आयोजित करण्यावर निर्णय घ्यावा असे निर्देश उच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) या सर्वोच्च प्राधिकरणला दिले.

विशेष परीक्षा घेण्यासाठी पूर प्रभावित विद्यार्थ्यांनी एजन्सीला निवेदन सादर केल्यास त्यावर संबंधित जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा करून १५ दिवसांमध्ये निर्णय द्यावा असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले.भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील नीतेश बावणकर या विद्यार्थ्याने उच्च न्यायालयाला पत्र लिहून पुरामुळे निर्माण झालेल्या विविध अडचणींची माहिती देत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश देण्याची विनंती केली होती. न्यायालयाने त्या पत्राची तत्काळ दखल घेऊन या प्रकरणावर सोमवारी सायंकाळी विशेष सुनावणी घेतली. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारला या मुद्यावर मंगळवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत भूमिका मांडण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार प्रकरणावर मंगळवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्या न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने काही भागातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलता येणार नाही अशी भूमिका मांडली. जिल्हाधिकाऱ्यांना ही परीक्षा पुढे ढकलण्याचा अधिकार नाही. यासाठी एजन्सी सर्वोच्च प्राधिकरण आहे. हा अधिकार केवळ एजन्सीला आहे असे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्देश दिले. स्थानिक प्रशासनाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता आवश्यक प्रयत्न करावेत असेही न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय