नागपूर : क्रिकेट सट्ट्यात हरलेल्या रकमेची वसुली करण्यासाठी आलेल्या दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. तर, बदल्यात त्याच्या नातेवाईकांनी वसुलीकर्त्यालाही बदडले. सीताबर्डीत शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. सीताबर्डीतील राहाणाऱ्या एका व्यापाऱ्याचा मुलगा आयपीएलच्या सट्टेबाजीत लाखों रुपये हरला. तो रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे बुकीच्यावतीने आशिष सोनवणे आणि राजू रेड्डी हे दोघे त्याच्या घरी वारंवार जात होते. त्यांच्या तगाद्यामुळे संबंधित तरुण घरातून बाहेर पडेनासा झाला. शनिवारी सायंकाळी पुन्हा हे दोघे ‘रितेश‘च्या घरी धडकले. त्यांनी रितेशला मारहाण करताच रितेशच्या नातेवाइकांनीही सोनवणे आणि रेड्डीला बदडले. त्यानंतर दोघांकडूनही परस्परांविरुद्ध तक्रार नोंदविण्याचे प्रयत्न झाले. सीताबर्डी पोलिसांनी एनसी करून दोघांनाही समज देत घराकडे पाठविले.(प्रतिनिधी)
क्रिकेट सट्ट्याच्या वसुलीतून वाद
By admin | Updated: July 27, 2015 03:33 IST